मराठी बातम्या /बातम्या /देश /कर्तव्यदक्ष टिंकीसाठी पोलिसांकडून अनोखी आदरांजली; गुन्हेगारांमध्ये होती दहशत

कर्तव्यदक्ष टिंकीसाठी पोलिसांकडून अनोखी आदरांजली; गुन्हेगारांमध्ये होती दहशत

कुत्रा पोलिसदलात कायमच महत्त्वाचा साथीदार राहिला आहे. अशाच एका कुत्र्याला पोलिसांनी अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कुत्रा पोलिसदलात कायमच महत्त्वाचा साथीदार राहिला आहे. अशाच एका कुत्र्याला पोलिसांनी अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कुत्रा पोलिसदलात कायमच महत्त्वाचा साथीदार राहिला आहे. अशाच एका कुत्र्याला पोलिसांनी अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुजफ्फरनगर, 7 फेब्रुवारी : पोलीस दलात (police force) कायमच श्वानपथक (dog squad) अत्यंत कळीची भूमिका बजावत असतं. या श्वानांचं साहजिकच पोलिसांशी अत्यंत जिव्हाळ्याचं नातं बनतं. श्वानांचा मृत्यू (death) पोलिसांसाठी कधीच न भरून येणारी हानी बनून जातो.

अशाच एका टिंकी नावाच्या श्वानाचा मृत्यू झाला आहे. टिंकी डॉग स्क्वाडमध्ये एएसपीच्या (ASP) पदावर कार्यरत होती. टिंकीला मुजफ्फरनगर पोलिसांनी श्रद्धांजली (tribute) दिली आहे. तिचा पुतळा पोलीस लाईनमध्ये लावण्यात आला आहे. सिटी एसपी (city SP) अर्पित विजयवर्गी यांच्या उपस्थितीत डॉग हॅन्डलर (dog handler) सुनील कुमार यानं टिंकीच्या प्रतिमेचं अनावरण केलं. टिंकीनं लूटमार, चोरी आणि हत्येच्या (murder) 49 केसेस सोडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

हे ही वाचा-मंदिर उभारणीसाठी या भाविकाकडून तब्बल 20 कोटींचं दान

अशी उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल पोलीस लाईनमध्ये टिंकीचा पुतळा बनवला गेला आहे. तिला शासकीय सन्मानासह शेवटचा निरोप दिला गेला. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टिंकीचा मृत्यू झाला. टिंकीनं 2013 साली मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) बीएसएफ प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेतलं होतं. प्रशिक्षण (Training) पूर्ण झाल्यावर टिंकीला हेड कॉन्स्टेबल म्हणून डॉग स्क्वाडमध्ये सहभागी करून घेतलं गेलं. अनेक अवघड केसेस सोडवण्यात पोलिसांची मदत केल्यामुळे तिला एएसपीचं पद दिलं गेलं होतं.

टिंकी आठ वर्षांची जर्मन शेफर्ड होती. आजवर तिनं अनेक ब्लाइंड केसेस सोडवण्यात पोलिसांची मदत केली. सहायक हॅंडलर धरम सिंह टिंकीबाबत सांगतात, की खरं पाहता कुत्रे गुन्ह्याच्या 24 तासानंतर वासाचा माग काढू शकत नाहीत. मात्र टिंकीकडे वेगळी आणि मोठीच क्षमता होती. तिनं आजवर सोडवलेल्या केसेसमध्ये 10 दिवसांपासून हरवलेल्या माणसाचा मृतदेह शोधणं, 10 किलोमीटरवरच्या चोरांच्या टोळीचा माग काढणं या उल्लेखनीय केसेस सांगता येतात.

First published:

Tags: Dog, Police, Statue