मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मंदिर उभारणीसाठी या भाविकाकडून तब्बल 20 कोटींचं दान; देशात हिंदू धर्माच्या प्रसारासाठी कटिबद्ध

मंदिर उभारणीसाठी या भाविकाकडून तब्बल 20 कोटींचं दान; देशात हिंदू धर्माच्या प्रसारासाठी कटिबद्ध

सध्या या भाविकाने मोकळेपणाने दिलेल्या दानाची मोठी चर्चा सुरू आहे

सध्या या भाविकाने मोकळेपणाने दिलेल्या दानाची मोठी चर्चा सुरू आहे

सध्या या भाविकाने मोकळेपणाने दिलेल्या दानाची मोठी चर्चा सुरू आहे

तिरुपती, 7 फेब्रुवारी :  तामिळनाडूतील तिरुपती मंदिराला दरवर्षी मोठ्या संख्येने भक्त जातात. देशातील नागरिकांच्या मनात तिरुपती बालाजीविषयी मोठं स्थान आहे. विशेष म्हणजे या मंदिरासाठी एका भाविकाने तब्बल चार एकर जमीन आणि 3.16 कोटी रुपयांचं दान केल्याचं वृत्त समोर आलं आहे. (Donation of Rs 20 crores from this devotee for construction of temple)

या भाविकाने दिलेल्या एकूण दानाची किंमत तब्बल 20 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. दानाचा कधी हिशेब करुन नये असे म्हणतात. मात्र या भाविकाने मोकळेपणाने आणि देवासाठी दान केलेली ही रक्कम पाहून अनेकांकडून कौतुक केलं जात आहे. या भाविकाचे नाव आर कुमारगुरु आहे. ते टीटीडी विश्वस्त मंडळाचे सदस्यदेखील आहेत. तामिळनाडूमधील एके ठिकाणी मंदिर उभारण्यासाठी कुमारगुरू यांनी जमीन दान केल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे कुमारगुरुंनी जेथे मंदिर बांधल जाणार आहे, त्या उलादरुपेटा भागातून एआयडीएमतेचे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

हे ही वाचा-देशातील पहिली व्यक्ती; या 35 वर्षीय तरुणीच्या नावामागे ना जात ना धर्म

कुमारगुरू यांनी जमिनीची कागदपत्र संस्थेच्या सदस्यांकडून दिली आहे. हिंदू धर्माचा प्रचार करण्याच्यादृष्टीने वरिष्ठांच्या सूचनेनुसार हे कार्य हाती घेतल्याचं कुमारगुरू यांनी सांगितलं. (Donation of Rs 20 crores from this devotee for construction of temple) यापूर्वीही कुमारगुरू यांनी तब्बल 1 कोटी रुपयांचं दान दुसऱ्या एका मंदिरासाठी केलं होतं. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना व्यंकटेशाचं दर्शन घेणं सोपं जावं यासाठी मंदिराची उभारणी केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय लवकरच एखादा चांगला मूहुर्त पाहून मंदिराची पायाभरणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून निधी गोळा केला जात आहे. गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्व नागरिक राम मंदिराच्या उभारणीसाठी दान करीत आहे.

First published:
top videos