वाशीम 05 जानेवारी : जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमुळे राज्यातल्या ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापलंय. राजकीय नेते ग्रामीण भागात सध्या झंझावती प्रचार करताहेत. राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी जि.प. प्रचासाराठी आज वाशीममध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी प्रचारसभेत बोलताना वादग्रस्त विधान केलं. विरोधी पक्षवाल्यांचे खिसे गरम आहेत. ते तुमच्याकडे आले तर पैसे घ्या असं ठाकूर म्हणाल्या. आम्ही आत्ताच सत्तेवर आलो आहोत. त्यामुळे आमचे खिसे गरम नाहीत असं त्यांनी सांगितलं. यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य म्हणजे सरळसरळ भ्रष्टाचारालाला उत्तेजन असल्याची टीका होतेय. मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला भाजपने तीव्र आक्षेप घेतलाय. ठाकूर यांचं वक्तव्य हे भ्रष्टाचाराला उत्तेजन देणारं आहे अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलीय. या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या यशोमती ठाकूर यांनी या आधीही अनेकदा आपल्य वक्तव्यामुळे वाद ओढवून घेतले आहेत.
बच्चू कडू यांचा घरचा आहेर
'शेतकऱ्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे. सामान्य नागरिक असो की शेतकरी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतलीच पाहिजे,' असं म्हणत नवनिर्वाचित मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. 'प्रशासनाकडून झालेली चूक दुरुस्त करणे गरजेचे आहे. असा काळ आला तर मी मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार आहे,' असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.
'मातोश्री'बाहेर अरेरावी? शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर एक शेतकरी आपल्या मुलीसह आला होता. मात्र पोलिसांनी या शेतकऱ्यासोबत अरेरावी केली. याबाबत बोलताना बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना भेटलं पाहिजे, असं ते म्हणाले.
मतांसाठी तुमच्या घरी लक्ष्मी आली तर तिचं स्वागत करा, नाही म्हणू नका असं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केल्याने नवा वाद निर्माण झालाय. भाजपने त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. pic.twitter.com/0PXbrBrmiS
'खातं कुठलंही असो, मी त्याासाठी मागणी केली नव्हती. मात्र सामाजिक न्याय मिळालं असतं तर अपंग बांधवांना न्याय देता आला असता. सामाजिक न्याय खात्याची तशी मागणी कोण करत नाही. मात्र आम्ही ते मागितले होते, त्यामाध्यमातून अपंगांचे प्रश्न मार्गी लागले असते,' अशी प्रतिक्रिया खातेवाटपावर बोलताना बच्चू कडू यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.