नवी दिल्ली, 25 जून : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा (Mumbai terror attacks) सूत्रधार साजिद मीर (master mind Sajid Mir ) याला पाकिस्तानने अटक (pakistan arrest sajid mir) केली आहे. लाहोरमधील दहशतवादविरोधी (labor) न्यायालयाने साजिद मीरला 15 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तैयबाचा (lashkar a Tayyab) दहशतवादी साजिद मीर याला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.
साजिद मीर हा एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतला महत्वाचा दहशतवादी आहे. पाकिस्तानने वारंवार साजिद मीर पाकिस्तानात नसल्याचे सांगितले होते. त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही पाकिस्तान सरकारने केला होता. दरम्यान साजिदला ताब्यात घेऊन पाकिस्तानला दहशतवादाचा डाग पुसायचा आहे, असे बोलले जात आहे.
हे ही वाचा : 'मी मागून वार करणारा नाही'; आमदारांच्या बंडामागे हात असल्याच्या आरोपावर उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
अमेरिकन एजन्सी एफबीआयने साजिद मीरवर पाच लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश जवळपास 12 वर्षांपासून त्याचा शोध घेत आहेत. साजिद मीर हा संयुक्त राष्ट्र (UN) हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. साजिद मीर हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सुत्रधार आहे. या हल्ल्यात सुमारे 170 लोक मारले गेले. यामध्ये प्रामुख्याने भारतीय, अमेरिकन आणि जपानसह अनेक ठिकाणच्या पर्यटकांचा समावेश होता.
पाकिस्तानकडून अधिकृतपणे दुजोरा नाही
निक्केई एशियाच्या अहवालानुसार, एफबीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, साजिद मीर पाकिस्तानमध्ये जिवंत आहे, कोठडीत आहे आणि त्याला शिक्षा झाली आहे. एका माजी पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानने भारत आणि अमेरिकेला सांगितले की मुंबई हल्ल्यातील आरोपी साजिद मीर एकतर मरण पावला आहे किंवा त्याचा ठावठिकाणा माहित नाही. मात्र, मीरच्या अटकेबाबत पाकिस्तानने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. याचबरोबर उप परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार निक्केई एशियाला म्हणाल्या की, या प्रकरणावर मला कोणतेही भाष्य करायचं नाही.
हे ही वाचा : Mumbai Police : आमदारांच्या संरक्षणात असलेले पोलीस आहेत तरी कुठे? गुवाहाटी की मुंबई ?
FATF ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची योजना?
साजिद मीरला अटक करून पाकिस्तान दहशतवादाविरोधात काम करत असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवत असल्याचे भासवत आहे. FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्याची पाकिस्तानची योजना असल्याचेही सांगितले जात आहे. जून 2018 पासून पाकिस्तानचा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. यावेळी जर्मनीत झालेल्या बैठकीत FATF ने पाकिस्तानच्या जमिनीची पडताळणी करून ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्याबाबत निर्णय देणार असल्याचे सांगितले होते.
साजिद मीर हा मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर
एफबीआयचा दावा आहे की मीरने 2008 ते 2009 दरम्यान डेन्मार्कमधील वृत्तपत्र आणि त्याच्या कर्मचार्यांवर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला होता. 2011 मध्ये शिकागो कोर्टाने त्याच्यावर दहशतवादाचा आरोप लावला होता. डिसेंबर २०२१ मध्ये, यूएस स्टेट डिपार्टमेंटने मुंबई हल्ल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून साजिद मीरचे नाव दिले. तो पाकिस्तानात मुक्तपणे राहतो, असेही सांगितले.
पाकने जिहादी नेत्यांना अटक केली
वॉशिंग्टनमधील पाकिस्तानचे माजी राजदूत आणि सध्या वॉशिंग्टनमधील हडसन संस्थेत दक्षिण आणि मध्य आशियाचे संचालक हुसैन हक्कानी म्हणाले की, पाकिस्तानने आता FATF ग्रे लिस्टमधून काढून टाकण्याच्या नियमांचे पालन केले आहे. याचा अर्थ असा की काही भारतविरोधी जिहादी नेते ज्यांच्याबद्दल पाकिस्तानने यापूर्वी माहिती नाकारली होती त्यांना आता शोधून ताब्यात घेण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 26/11 mumbai attack, Mumbai News, Pakisatan