Home /News /national /

कर्तव्यनिष्ठेला सलाम! ड्युटीवर हजर होण्यासाठी पोलिसाने 17 दिवसांत चालत कापले 550 किमी अंतर

कर्तव्यनिष्ठेला सलाम! ड्युटीवर हजर होण्यासाठी पोलिसाने 17 दिवसांत चालत कापले 550 किमी अंतर

पोलीस कर्मचारी वयाच्या 59 व्या वर्षी दररोज 30 किमी असं 17 दिवसात 550 किमी अंतर पार करून ड्युटीवर हजर झाला.

    उज्जैन, 18 एप्रिल : लॉकडाऊनच्या काळात पोलीस कर्मचारी त्यांचे कर्तव्य पार पाडताना कोणतीही कसूर सोडत नसल्याची अनेक उदाहरणं दिसत आहेत. घरच्या लोकांपासून दूर ड्युटी करताना लोकांचा रोषही ओढवून घ्यावा लागत आहे. अनेकदा ड्युटीवर कठीण प्रसंगाला सामोरे जाताना दिसतात. यातूनही पोलिसांमध्ये असलेली माणुसकी आणि त्यांची कर्तव्य निष्ठा दिसून येते. आता मध्यप्रदेशातील एका 59 वर्षाच्या पोलिसाने ड्युटी जॉइन करण्यासाठी तब्बल 550 किमी प्रवास चालत केला. पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश सिंग तोमर यांनी ग्वाल्हेर ते उज्जैन हे अंतर 17 दिवसांत चालत पूर्ण केलं. रमेशसिंग तोमर हे उज्जैनमधील नीलगंगा ठाण्यात कार्यरत आहेत. उज्जैनमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी तोमर यांचं जल्लोषात स्वागत केलं. त्यानंतर तोमर यांची रुग्णालयात तपासणी केली. रुग्णालयाने तोमर पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सांगितल्यानंतर आता ते सोमवारी ड्युटीवर हजर होतील. काही दिवसांनी ते निवृत्त होतील. असे असतानाही त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम केला जात आहे. एका प्रकरणामध्ये व्हिसेराचा अहवाल देण्यासाठी रमेश तोमर हे एफएसएलच्या लॅबमध्ये ग्वाल्हेर इथं 20 मार्चला गेले होते. दरम्यान, 22 मार्चला जनता कर्फ्यू लागला आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे तोमर ग्वाल्हेरमध्येच अडकले. त्यानंतर काही दिवस ते मुलगी आणि जावयाकडे थांबले होते. मात्र ड्युटी जॉइन करायची असल्यानं त्यांनी चालत उज्जैन गाठण्याचा निर्णय घेतला. हे वाचा : 'ड्युटीवर आहे शिव्या देऊ नका, आम्हीही 30 दिवस घरच्यांना पाहिलं नाही' कोरोनाच्या संकटकाळात कर्तव्य बजावण्यासाठी ग्वाल्हेरहून पायी चालत निघाले. जवळपास 550 किमी चालल्यानंतर शुक्रवारी ते उज्जैन इथं पोहोचले. त्यांना यासाठी 17 दिवस लागले. जेव्हा ते चालत ड्युटीवर आल्याचं समजलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांचा सन्मानही करण्यात आला. हे वाचा : नातं माणुसकीचं! पोलिसाने स्कुटीवरून 860 किमी प्रवास करत वाचवले तरुणाचे प्राण लॉकडाऊनच्या काळात रमेश तोमर हे ग्वाल्हेरमध्ये होते. तिथून 24 तारखेला मुरैना या त्यांच्या गावी गेले. तिथं रमेश यांची पत्नी राहते. त्यानंतर पत्नीला तिथेच ठेवून रमेश यांनी उज्जैनला चालत येण्याचा निर्णय़ घेतला. तेव्हा पत्नीही मी सोबत येणार म्हणत होती. मात्र रमेश यांनी पत्नीला नको येऊ सांगत एकटेच बाहेर पडले. हे वाचा : औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म रमेश तोमर म्हणाले की, दररोज 30 किलोमीटर पायी चाललो. जिथं जेवण मिळायचं तिथं खायचो. या काळात अनेक वाहनं रस्त्याने गेली पण कुणीच लिफ्ट दिली नाही. शेवटी पायी चालतच उज्जैनला पोहोचलो. Coronavirus चा धोका : नियमित व्यायाम केल्यानं फायदा होतो का? संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या