बेंगळुरू, 18 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या मध्ये लोकांना फक्त अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहेत. मात्र तरीही काही ठिकाणी या सेवा मिळण्यातही अडचणी येत आहेत. अशावेळी पोलीस कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी लोकांच्या मदतीला धावून जात आहेत. अशीच एक मदतीची हाक ऐकून पोलीस कर्मचाऱ्याने जवळपास 860 किमी अंतर स्कुटी चालवून रुग्णाला औषध दिलं. कर्नाटकात कॅन्सरच्या रुग्णाचे औषध संपले होते. त्याला औषधांची गरज होती. धारवाडमध्ये राहणाऱ्या उमेश नावाच्या तरुणाला पोलिसांनी वेळीच औषध उपलब्ध करून दिलं. त्याला लागणार औषध फक्त बेंगळुरूत मिळत होते. बेगळुरूत राहणारे पोलीस एस कुमारस्वामी यांनी एका चॅनेलवर उमेशची समस्या ऐकली. त्यात उमेश सांगत होता की, त्याच्याकडे औषध संपलं आहे आणि रविवारपर्यंत त्याला औषध घेतलं पाहिजे. पण लॉकडाऊनमुळे आता ते शक्य नाही.
Kudos to Shri. S. Kumaraswamy, Head Constable who travelled solo on bike from Bengaluru to Dharawad traversing 430 kms to provide life saving medication for a cancer patient.@CPBlr appreciated his good deed. pic.twitter.com/BSJm6caRie
— ಬೆಂಗಳೂರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ BengaluruCityPolice (@BlrCityPolice) April 16, 2020
औषध गरजेचं असल्याचं समजताच एस कुमारस्वामी यांनी मदत करायचं ठरवलं. त्यासाठी एसीपी कडून त्यांनी परवानगी घेतली. दुसऱ्या दिवशी शिफ्ट संपताच न्युज चॅनेलच्या ऑफिसमध्ये जाऊन उमेशचा नंबर घेतला. त्यानंतर बेगळुरूत औषध घेतलं. एसीपीकडून परवानगी मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी चार वाजतात धारवाडला जाण्यासाठी निघाले. दुपारी अडीच वाजता ते धारवाडला पोहोचले. या प्रवासात त्यांनी फक्त पाणी आणि बिस्किट एवढंच काय ते खाल्लं होतं. उमेशच्या घरी औषध दिल्यानंतर ते काही वेळ थांबले आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. हे वाचा : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना होणार मदत, 7 वर्षीय मुलाची करामत सलग प्रवास करून थकलेले कुमारस्वामी चित्रदुर्ग इथल्या फायर स्टेशनमध्ये थांबले. तिथं विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगळुरूकडे निघाले. धारवाडला जाण्याबाबत आणि औषध पोहोचवण्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्या ठिकाणाशी किंवा माणसाशी कसलंही नात नाही. पण त्याला मदतीची गरज आहे हे समजताच मी जायचं ठरवलं.’ याबद्दल बंगळुरू शहर आयुक्तांनीही एस कुमारस्वामी यांचे कौतुक केले. हे वाचा : पोलीसांची व्यथा : ‘ड्युटीवर आहे शिव्या देऊ नका, आम्हीही 30 दिवस घरच्यांना पाहिलं नाही’ संपादन - सूरज यादव