औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म

औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी डिलिव्हरी, दिला गोंडस मुलीला जन्म

घाटी हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली असून तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 18 एप्रिल: शहरातील घाटी हॉस्पिटलमध्ये एका कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती झाली असून तिनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळ आणि बाळंतीण दोन्ही सुखरूप आहे. नवजात शिशुचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून ते चाचणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी नऊ महिन्यांच्या गरोदर महिलेची प्रसुती शस्त्रक्रिया पद्धतीने केली. गरोदर महिला कोरोनाबाधित असल्यामुळे तिची प्रसुती करणं, डॉक्टरांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र, कोरोनाविरुद्ध लढा देणारे डॉक्टर आणि नर्सने महिलेची यशस्वी प्रसूती केली. महिलेचीही प्रकृती उत्तम आहे. बाळाचे वजन सव्वा तीन किलो भरले असून ते ठणठणीत आहे. नवजात बाळाची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यांचे स्वॅबचे प्रत्येकी तीन नमुनेही घेण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.

हेही वाचा..पतीशी भांडण करुन घराबाहेर पडलेली महिला सापडली 'कोरोना'च्या तावडीत!

आई आणि बाळ क्वारंटाइन

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका कोरोनाबाधित महिलेनेही एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेने 16 एप्रिल रोजी नंदग्राम येथील खाजगी रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता. शनिवारी संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा..चीनने 190 लाख कोटी द्यावेत'; मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

सध्या महिलेला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे आई आणि बाळाला क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

बाळाची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 18, 2020, 6:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या