Home /News /lifestyle /

Coronavirus चा धोका : नियमित व्यायाम केल्यानं फायदा होतो का?

Coronavirus चा धोका : नियमित व्यायाम केल्यानं फायदा होतो का?

Coronavirus ची लागण झाल्यानंतर उद्भवणारी गंभीर परिस्थिती एक्सरसाइजमुळे (exercise) टाळता येऊ शकते, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

    वॉशिंग्टन, 17 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (CoronaVirus) बचावासाठी सोशल डिस्टेसिंग, मास्क लावणं, हाय स्वच्छ धुणं, इतर वस्तू नीट Sanitize करून घेणं जितकं म्हत्त्वाचं आहे, तितकंच कोरोनाव्हायरसपासून होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी एक्सरसाइजही (Exercise) म्हत्त्वाची आहे. काही अभ्यासानुसार, एक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (Acute respiratory distress syndrome - ARDS) हे कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमुख कारण आहे. नियमित एक्सरसाइज हे ARDS वर योग्य असा उपचार आहे. युएसमधील युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या (University of Virginia) संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. जर्नल रेडॉक्स बायोलॉजीमध्ये (Journal redox biology) तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. लॉकडाऊमध्ये धक्कादायक बातमी, बैलाच्या अंत्यसंस्कारासाठी जमा झाले 3 हजार लोक शास्त्रज्ञांनी एक्स्ट्रासेल्युलर सुपरऑक्साइड डिसम्युटेस (Extracellular peroxide disputes- EcSOD) या अँटिऑक्सिडंटचा अभ्यास केला. संशोधकाचे अभ्यासक झेन यान म्हणाले, "EcSOD हे अँटिऑक्सिडंट फ्री रेडिकल्सचं प्रमाण कमी करतं, टिश्युंना हानी पोहोचू देत नाही आणि आजारांपासून आपल्याला संरक्षण देण्यात मदत करतं. आपले स्नायू नैसर्गिकरित्या EcSOD ची निर्मिती करतात आणि इतर अवयवांपर्यंत ते पोहोचतं. फुफ्फुस, हृदय आणि किडनीसंबंधी आजारांमध्ये या अँटिऑक्सिडंटचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलं आहे. जर कार्डियोवस्क्युलर एक्सरसाइज केल्या तर EcSOD च्या निर्मितीला अधिक चालना मिळते" शास्त्रज्ञांनी उंदरावर प्रयोग करून पाहिला. EcSOD ची निर्मिती रोखल्याने त्याच्या हृदयाच्या समस्या अधिक गंभीर झाल्या. मात्र जेव्हा EcSOD ची निर्मिती वाढवली तेव्हा त्याच्या सकारात्मक परिणाम दिसून आल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. 'या' देशात सापडला होता सर्वात पहिला Coronavirus, महिला डॉक्टरने लावला शोध "आपण आयसोलेशनमध्ये फार काळ राहू शकत नाही. नियमित व्यायाम केल्याने आपल्याला माहितीही नाहीत असे अनेक फायदे आपल्या आरोग्याला होतात. त्यापैकी एक म्हणजे श्वसनसंबंधी आजारांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. त्यामुळे व्यायाम करा", असं आवाहन यान यांनी केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या