ग्वाहलेर, 15 मार्च : भारतीय जनता पार्टी (BJP) मधील अंतर्गत वाद उघड झाला आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेले नेते ज्योतिरादीत्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांचे कार्यकर्ते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्यात जोरदार धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. ग्वाहलेरमध्ये (Gwalior) झालेल्या घटनेचे गंभीर पडसाद आगामी काळात मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) राजकारणात उमटण्याची शक्यता आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल (Video Viral) झाला आहे. काय आहे प्रकरण? मध्य प्रदेश भाजपा अध्यक्ष व्ही.डी. शर्मा आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे भाजपाच्या अनुसूचित वर्गाचे कार्यकर्ता रामवीर नीगम यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. या दोन नेत्यांच्या उपस्थितीमध्येच जिल्हा अध्यक्ष योगेशपाल गुप्ता आणि शिंदे समर्थक हरिओम शर्मा यांच्यात वाद सुरू झाला. शिंदे समर्थक हरिओम शर्मा पदाधिकाऱ्यांसोबत जेवणासाठी आतमध्ये जात होते. त्यावेळी गुप्ता यांनी त्यांना रोखलं. त्यानंतर सुमारे दहा मिनिटं दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर अखेर वरिष्ठ नेत्यांना हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. वरिष्ठ नेत्यांनी पक्ष शिस्तीचा दाखला देत भांडण मिटवलं. मात्र त्या निमत्ताने भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे.
राहुल गांधींनी केला होता उल्लेख काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ज्योतिरादीत्य शिंदे यांचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, ‘त्यांना भाजपामध्ये मागची सीट मिळाली आहे. काँग्रेसमध्ये ते होते तेव्हा त्यांच्याकडे निर्णायक भूमिका होती. शिंदेजी माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांना मेहनत करा तुम्ही येत्या काळात मुख्यमंत्री व्हाल असं मी सांगितले होतं,’ असा दावाही राहुल यांनी यावेळी केला होता. ( वाचा : कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला, कार्यकर्त्यांकडून आरोपीला बेदम मारहाण ) राहुल यांच्या या वक्तव्याचे देखील जोरदार पडसाद उमटले होते. त्यानंतर ज्योतिरादीत्य शिंदे यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिलं होतं.