मराठी बातम्या /बातम्या /देश /

Tamil Nadu Elections 2021: रॅलीनंतर हॉटेलमध्ये जाताना कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला, आरोपी अटकेत

Tamil Nadu Elections 2021: रॅलीनंतर हॉटेलमध्ये जाताना कमल हासन यांच्या गाडीवर हल्ला, आरोपी अटकेत

हासन यांच्या गाडीवर हल्ला (Attack On Kamal Hassan's Car) करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते.

  • Published by:  Kiran Pharate

कांचीपूरम 15 मार्च : तामिळनाडूमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. मक्कल निधी मय्यमचे प्रमुख (Makkal Needhi Maiam) अभिनेते कमल हासन (Kamal Hassan) यंदा प्रथमच स्वतंत्र पक्षासह विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोईम्बतूर दक्षिण (Coimbatore South) मतदारसंघातून हासन निवडणूक लढवणार आहेत. अशात आता हासन यांच्या गाडीवर हल्ला (Attack On Kamal Hassan's Car) करण्यात आला आहे. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हासन निवडणूक प्रचारानंतर कांचीपूरममधील एका हॉटेलमध्ये जात होते. आतापर्यंत मिळालेल्या वृत्तानुसार, हासन यांना दुखापत झालेली नाही, मात्र या हल्ल्यात गाडीचं भरपूर नुकसान झालं आहे.

कमल हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी तरुणाला पकडण्यात आलं असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. एमएनएमचे नेते ए.जी मौर्य यांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे. मौर्य यांनी ट्वीट करत म्हटलं, की हासन यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न. हासन यांच्यावर हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आरोपी दारुच्या नशेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी आरोपीला मारहाण केली. यानंतर पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केलं.

तमिळनाडूमध्ये मक्कल निधी मय्यमनं काही दिवसांपूर्वीच घोषणा केली आहे, की पक्षाचे संस्थापक कमल हासन कोईम्बतूरमधून निवडणूक लढवतील. हासन कोईम्बतूर दक्षिणमधून निवडणुकीच्या रिंगाणात उतरले आहेत. याआधी त्यांच्या पक्षानं सहा एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. अभिनेता आणि नेता कमल हासन यांचा मक्क्ल नीधि मय्यम पक्ष आपल्या दोन मित्रपक्षांसह निवडणूक लढवणार आहे. मक्क्ल नीधि मय्यम 234 पैकी 154 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यांच्या दोन्ही मित्रपक्षाला त्यांनी प्रत्येकी 40-40 जागा सोडल्या आहेत. तामिळनाडूतील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाला 2 मे रोजी लागेल.

First published:

Tags: Kamal hassan, Tamil actor, Tamil nadu, कांचीपुरम