कोरोनातून बरं झाल्यावर योद्धा घरी गेला, दारातूनच बायको मुलांना पाहिलं आणि...

कोरोनातून बरं झाल्यावर योद्धा घरी गेला, दारातूनच बायको मुलांना पाहिलं आणि...

रुग्णालयातून निघाल्यानंतर सर्वात आधी घरी गेले. तिथं मुलगी आणि पत्नीची त्यांनी 12 फूटांवरूनच भेट घेतली.

  • Share this:

इंदौर, 25 एप्रिल : कोरोनाला रोखण्यासाठी सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. दरम्यान, जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. याकाळात आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि प्रशासन अहोरात्र झटत आहे. त्यातील काही लोकांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशाच एका पोलीस ठाण्याच्या इन्चार्जला कोरोना झाला होता. त्यांच्यावर उपचारानंतर शनिवारी ते ठणठणीत बरे झाले. यावेळी ते म्हणाले की, जर तुम्ही हिंमत ठेवलीत तर कोरोना जास्त मोठा आजार नाही. त्याला हरवता येऊ शकतं.

टीआय संतोष सिंग यादव रुग्णालयातून निघाल्यानंतर सर्वात आधी घरी गेले. तिथं मुलगी आणि पत्नीची त्यांनी 12 फूटांवरूनच भेट घेतली. वडिलांना समोर पाहताच मुलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. ती म्हणाली की, बाबा तुम्ही कोरोनाला हरवलंत. यावर मुलीला हात हालवून इशारा केला आणि संतोष सिंग यादव पुन्हा हॉटेलमध्ये परतले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संतोष सिंग यादव यांना 15 एप्रिलला ताप आला होता. तसंच गळ्यामध्ये थोडा त्रास जाणवत होता. तेव्हा टेस्ट केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. याची माहिती मिळताच ते लगेच चोइथराम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. याठिकाणी उपचार घेतल्यानंतर ते बरे झाले. तेव्हा सर्वात आधी त्यांनी तिथल्या सर्व कोरोना वॉरिअर्सचे आभार मानले.

हे वाचा : Covid 19 रुग्णालयात काम कऱणाऱ्या महिला डॉक्टरला सोसायटीत प्रवेश नाकारला

कोरोना व्हायरसची लक्षणं दिसताच घाबरून न जाता खंबीर राहिलो. रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचना पाळल्या. मास्क लावला, सोशल डिस्टन्सिंगचं कडक पालन केलं. या खबरदारीमुळेच आपण यातून बरं झाल्याचे संतोष सिंग यादव यांनी सांगितले.

हे वाचा : दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

टीआय संतोष सिंग यादव म्हणाले की, कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक वरिष्ठ अधिकारी सातत्यानं माझ्याशी फोनवरून बोलत होते. त्यांनी मला आणि कुटुंबियांना आधार दिला. कोणत्याही प्रकारे मनोधैर्य ढळणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली यामुळेच कोरोनाशी यशस्वी लढा दिला.

हे वाचा : कोरोनाच्या 69 रुग्णांना थेट फूटपाथवर केलं उभा, वाचा नेमकी कुठं घडली घटना

संपादन - सूरज यादव

First published: April 25, 2020, 8:24 PM IST

ताज्या बातम्या