कोरोनाच्या 69 रुग्णांना थेट फूटपाथवर केलं उभा, वाचा नेमकी कुठं घडली धक्कादायक घटना

कोरोनाच्या 69 रुग्णांना थेट फूटपाथवर केलं उभा, वाचा नेमकी कुठं घडली धक्कादायक घटना

कोरोनाची लागण झालेल्या 69 रुग्णांना सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या बाहेर जवळपास एक तास वाट बघावी लागली.

  • Share this:

लखनऊ, 25 एप्रिल : देशभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांबाबत बेजबाबदारपणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या 69 रुग्णांना सरकारी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या बाहेर जवळपास एक तास वाट बघावी लागली. या रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. रुग्णाना दाखल करून घेण्यावरून डॉक्टर आणि मेडिकल स्टाफमध्ये भांडणामुळे हा प्रकार झाल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोनाच्या या रुग्णांना आग्र्याहून सैफई इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. याबाबत स्थानिक प्रशासनाने म्हटलं की, बससोबत एस्कॉर्ट पथकही पाठवलं होतं. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये रुग्ण हॉस्पिटलच्या गेट बाहेर बसलेले दिसत आहेत. रुग्णालयाचे गेट बंद होते तेव्हा बाहेर बसलेल्या रुग्णांना पोलिस कर्मचारी थोडं अंतर ठेवून बसा असे आदेश देत होते.

वरिष्ठ पोलीस अधिकारी चंद्रपाल सिंग रुग्णालयता पोहोचले. व्हिडिओमध्ये ते म्हणतात की,'इथंच थांबा, मेडिकल टीम लवकरच इथं येईल आणि तुमची यादी तयार करून तुम्हाला आत नेलं जाईल. इकडे तिकडे फिरू नका.' दरम्यान, कुलपतींनी म्हटलं की, माहितीच्या अभावामुळे हे घडलं असून याप्रकरणी सैफई रुग्णालयातील डॉक्टर किंवा मेडिकल स्टाफला दोष देता येणार नाही.

हे वाचा : दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉक्टर राजकुमार यांनी सांगितलं की, कोण बेजबाबदार हे सांगता येणार नाही. मात्र रुग्ण बुधवारी पोहोचले होते. इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा रुग्ण पाठवले जातात तेव्हा एक प्रक्रिया असते. डॉक्टरा किंवा जबाबदार अधिकारी रुग्णांची एक यादी घेऊन येतात. त्यानंतर रुग्णांना दाखल करून घेतलं जातं. आमची टीम सतर्क होती मात्र ते एक दिवस आधीच पोहोचले आणि याची माहिती टीमला नव्हती. कागदपत्रे नसल्यामुळे आमच्या टीमने त्यांना आत घेतलं यासाठी अर्धा एक तासाचा कालावधी लागला असंही कुलपतींनी सांगितलं.

हे वाचा : Good News - भारताची स्थिती सुधारली; कोरोनाच्या रुग्णवाढीचा दर झाला कमी

First published: April 25, 2020, 7:39 PM IST

ताज्या बातम्या