जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : नवी मुंबईमध्ये दुबे-उथप्पाचं वादळ, RCB च्या बॉलिंगची धुलाई

IPL 2022 : नवी मुंबईमध्ये दुबे-उथप्पाचं वादळ, RCB च्या बॉलिंगची धुलाई

IPL 2022 : नवी मुंबईमध्ये दुबे-उथप्पाचं वादळ, RCB च्या बॉलिंगची धुलाई

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) अखेर चेन्नई सुपर किंग्सची (CSK vs RCB) बॅटिंग तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 216 रन केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) अखेर चेन्नई सुपर किंग्सची (CSK vs RCB) बॅटिंग तळपली आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 216 रन केल्या आहेत. शिवम दुबेने (Shivam Dube) 46 बॉलमध्ये नाबाद 95 रन केले, यात 5 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता. उथप्पाने (Robin Uthappa) 50 बॉलमध्ये 88 रनची खेळी केली. उथप्पाने 9 सिक्स आणि 4 फोर मारले. आरसीबीकडून वानिंदु हसरंगाला 2 आणि जॉश हेजलवूडला 1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात आरसीबाचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर चेन्नईची सुरूवात अत्यंत खराब झाली. ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली स्वस्तात आऊट झाले, त्यामुळे चेन्नईची अवस्था 6.4 ओव्हरमध्ये 36/2 अशी झाली होती, पण उथप्पा आणि दुबे यांच्यात 73 बॉलमध्ये 165 रनची पार्टनरशीप झाली. आयपीएलच्या या मोसमात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. या हंगामातल्या पहिल्या चारही सामन्यांमध्ये सीएसकेचा पराभव झाला आहे. दुसरीकडे आरसीबीने 4 पैकी 3 मॅच जिंकल्या असून एका मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सीएसके शेवटच्या म्हणजेच 10व्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीची टीम फाफ डुप्लेसिस, अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, जॉश हेजलवूड, मोहम्मद सिराज, सुयश प्रभुदेसाई, आकाश दीप चेन्नईची टीम रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, ड्वॅन ब्राव्हो, क्रिस जॉर्डन, महीश तीक्षणा, मुकेश चौधरी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: csk , ipl 2022 , RCB
  • First Published :
जाहिरात
जाहिरात