जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Sher Shivraj : अफजल खानची भूमिका साकारताना आलं होतं 'या' गोष्टीचं प्रचंड टेन्शन; मुकेश ऋषी म्हणाले....

Sher Shivraj : अफजल खानची भूमिका साकारताना आलं होतं 'या' गोष्टीचं प्रचंड टेन्शन; मुकेश ऋषी म्हणाले....

Sher Shivraj : अफजल खानची भूमिका साकारताना आलं होतं 'या' गोष्टीचं प्रचंड टेन्शन; मुकेश ऋषी म्हणाले....

शेर शिवराज या चित्रपटात अफजल खानाची भूमिका भूमिका बॉलिवूड अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी साकारली आहे. मुकेश ऋषी यांनी एक मुलाखतीत या सिनेमातील त्यांच्या भूमिकेबद्दलचा अनुभव सांगितला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 एप्रिल- दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा चित्रपट 22 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शेर शिवराज या चित्रपटात दिग्पाल लांजेकर यांनी बहिर्जी नाईकांचे पात्र साकारले आहे. तर चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अफजल खानाची भूमिका भूमिका बॉलिवूड अभिनेते मुकेश ऋषी (Mukesh Rishi) यांनी साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मुकेश ऋषी यांनी एक मुलाखतीत या सिनेमातील त्यांच्या भूमिकेबद्दलचा अनुभव सांगितला आहे. शेर शिवराज सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात अफजलखानच्या एंट्रीने होते. अफजलखानाने केलेले अत्याचार, त्याची ताकद या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. या सिनेमातील भूमिकेबद्दल मुकेश म्हणाले की, दिग्पाल लांजेकर यांनी मला अफजल खानाच्या भूमिकेबाबत विचारले त्यावेळी मी ही भूमिका साकारण्यास खूपच उत्सुक होतो. ते अतिशय अभ्यासू आणि मेहनती दिग्दर्शक आहेत. या भूमिकेबाबत त्यांचा खूप अभ्यास आहे आणि तो प्रेक्षकांच्यासमोर कशा प्रकारे साकारायचा याची त्यांना जाणीव आहे. याअगोदर मला इंग्रजी चित्रपटात याच भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. मात्र त्याबाबत पुढे काहीच बोलणे झाले नाही. अफजलखान म्हटल्यावर डोळ्यासमोर उभा राहतो तो दाढीवाला धिप्पाड देहयष्टी असलेला खलनायक. मी बहुतेक चित्रपटात दाढी वापरलेली नाही.. त्याला आता खूप वर्षे लोटली होती. परंतु या भूमिकेसाठी मला दाढी दाखवण्यात आली त्यावेळी ती दाढी पाहून मी खूप टेन्शनमध्ये होतो. कारण दाढी असली की तुम्ही कम्फर्टेबल नसता मात्र या भूमिकेसाठी तसा गेटअप करावा लागणार याची मला कल्पना होती. कारण ही दाढीच या भूमिकेची खरी ओळख होती. वाचा-  अवघ्या काही तासांत लाखो रुपये कमावते सपना चौधरी, जगते रॉयल लाइफ मुकेश पुढे म्हणाले की, चित्रपटासाठी मला एक महिनाअगोदरच स्क्रिप्ट देण्यात आली होती. हे डायलॉग म्हणत असतानाच मला या भूमिकेची ताकद समजली होती. मी उत्तर भारतीय असल्याने मला उर्दू भाषेची चांगली जाण आहे. आणि ही भाषा मी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. चित्रपटातला माझा लूक खूप क्रूर दाखवण्यात आला आहे मी जेवढा क्रूर दिसेल तेवढी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उठावदार होईल हे मला माहित होते. त्यामुळे मला माझ्या भूमिकेबाबत कुठलीच सहानुभूती नको होती.

जाहिरात

अफजलखानच्या भूमिकेमुळे प्रेक्षक माझा तिरस्कार करणार याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु आजकाल सर्वांनाच या अभिनय क्षेत्राबाबत आणि पडद्यामागच्या गोष्टींबाबत माहीत झाले आहे . माझ्या सोसायटीतली लहान मुलं माझ्यासोबत खेळतात. त्यामुळे त्यांना माहीत झाले आहे की, मी चित्रपटात काम करतो आहे. माझ्या भूमिका खलनायकी ढंगाच्या आहेत. तुम्हाला या भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवायच्या असतील तर तुम्हाला त्या तितक्याच ताकदीने उभ्या कराव्या लागतात. या चित्रपटाचे पोस्टर मी माझ्या घरात लावणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात