मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यातील कोरोनाच्या 30 ते 40 टक्के रुग्णांना लवकरच मिळणार डिस्चार्ज, 5 मोठ्या अपडेट्स

पुण्यातील कोरोनाच्या 30 ते 40 टक्के रुग्णांना लवकरच मिळणार डिस्चार्ज, 5 मोठ्या अपडेट्स

(संग्रहित फोटो)

(संग्रहित फोटो)

आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.

पुणे, 11 मे : राजधानी मुंबईनंतर कोरोनाचं केंद्र झालेल्या पुण्यातून आता एक दिलासादायक बातमी आली आहे. पुणे शहरात काल दिवसभरात तब्बल 194 पेशंट्सना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्यात काल एकूण 202 रूग्ण घरी सोडले गेले. नवीन केंद्रीय कोरोना पॉलिसीनुसार राज्यातील डिस्चार्ज करण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या वाढणार आहे.

एकट्या पुणे शहरातील आणखी 30 ते 40 टक्के पेशंट्सना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आहे. आयसोलेशन आणि क्वारन्टाइन कालावधी कमी केल्याने लक्षणं नसलेल्या पेशंट्सना घरी सोडणार येईल.

पुण्यातील 5 मोठ्या अपडेट्स

1. कोरोनाबाबतच्या नवीन पॉलिसीनुसार हेल्दी पेशंट्सची सेंकड टेस्टही घेण्याची गरज नाही. गंभीर पेशंट्ससाठी मात्र डिस्चार्ज टेस्ट बंधनकारक असणार अहे. हेल्दी पेशंट्सच्या सेकंड टेस्ट होणार नसल्याने एनआयव्हीवरचा ताण कमी होणार आहे.

2. पुण्यात आजपासून वृत्तपत्र वितरणाला पुन्हा सुरुवात

3. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे पुण्यात सोमवारपासून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहे. इतकंच नाही तर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही वेळाही ठरवण्यात आल्या आहे. नियमांचं पालन करण्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आदेश आयुक्तांकडून देण्यात आले आहे.

4. हडपसरमध्ये आजपासून 5 दिवस स्वयंस्फूर्त जनता कर्फ्यू, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी. प्रभागात 3 रुग्ण आढळल्याने निर्णय

5. पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या वेगवेगळ्या महामार्गांवर स्थलांतरित मजुरांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मजुरांसाठी नाष्टा, जेवण आणि शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

संपादन - अक्षय शितोळे

First published:
top videos