Home /News /national /

Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार

Corona रुग्णांचा मृत्यू कसा झाला? आता डॉक्टरांना कारण द्यावं लागणार

ICMR ने कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत (corona patient death) नव्या गाइडलाइन्स जारी केल्यात. 

    नवी दिल्ली, 11 मे : देशातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नियम बदलले (Corona patient discharge) होते. आता कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबतही (corona patient death) नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबत नव्या गाइडलाइन्स (guidelines) जारी केल्यात. नव्या नियमावलीनुसार, कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं कारण डॉक्टरांना द्यावं लागणार आहे. डॉक्टरांना त्यांच्या रिपोर्टमध्ये कोरोना रुग्णाच्या मृत्यूचं कारणही नमूद करावं लागणार आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू श्वास घेण्यात त्रास होत असल्याने, हृदयासंबंधी समस्यांनी की न्यूमोनियामुळे झाला की इतर कारणांमुळे? त्याचा उल्लेख करावा लागणार आहे. आयसीएमआरच्या मते, कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूमागे काही इतर कारणंही असण्याची शक्यता आहे. ज्या रुग्णांचा मृत्यू होतो आहे, त्यांना श्वास घेण्यात त्रास, हृदयासंबंधी आणि न्युमोनियासारख्या समस्या वाढत असाव्यात, ज्यामुळे त्यांचा मृत्यू होत असावा. या सर्व आजारांबाबत वेगवेगळी माहिती असणं खूप गरजेचं आहे. असे आजार व्हायरसला शरीरात प्रवेश करण्याची संधी देतात आणि रुग्णांची प्रकृती आणखीनच बिघडते. काही दिवस रुग्ण या परिस्थितीशी लढतात मात्र काही दिवसांनंतर त्यांचा मृत्यू होतो. हे वाचा - पुण्यात कोरोनाच्या 30 ते 40 टक्के रुग्णांना मिळणार डिस्चार्ज, 5 मोठ्या अपडेट्स देशात कोरोनाव्हायरसमुळे मृत होणाऱ्यांची आकडेवारी 2000 पेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्र, दिल्ली आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा झपाट्याने वाढतो आहे. त्याठिकाणी मृत्यूदर कमी करण्याचा आयसीएमआरचा प्रयत्न आहे. आयसीएमआरच्या मते, जर या ठिकाणचा आजाराचा पॅटर्न आणि मृत्यूचा पॅटर्न याबाबत माहिती झाली तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूला रोखता येईल. त्यामुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचं कारण नेमकं काय याबाबत विभागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं सर्वाधिक कारण समजू शकेल. कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जबाबतही नवीन गाइडलाइन्स जारी केल्यात. त्यानुसार फक्त गंभीर रुग्णच बरे झाल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करून त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, तर सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांची लक्षणं गेल्यानंतर 10 दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल, त्यांची कोरोना टेस्ट होणार नाही. शिवाय डिस्चार्जनंतर या रुग्णांना आता घरी 14 ऐवजी 7 दिवसच आयसोलेशनमध्ये राहावं लागेल. असं या नियमावलीत सांगण्यात आलं आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - कोरोना रुग्णांच्या डिस्चार्ज नियमात बदल, आता 'या' अटींनुसार रुग्णालयातून सोडणार
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या