चेन्नई, 06 जुलै: नोबल पुरस्कार विजेत्या संत मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरीटी संस्थेवर नवजात अर्भकांच्या विक्रीचा आरोप लावण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात संस्थेतील एका महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली असून अजून दोघांची चौकशी सुरू आहे. अनिमा इंदवार या महिलेला अटक करण्यात आली आहे. अनिमा या निर्मल हृदय या संस्थेसाठी काम करतात. निर्मल हृदय ही संस्था मिशनरीज ऑफ चॅरिटीचाच एक भाग आहे. या संस्थेमार्फत अविवाहीत मातांसाठी आश्रयगृह चालवले जाते. मात्र याच आश्रयगृहातील एका महिलेचे मूल विकल्याचा आरोप तेथील कर्मचाऱ्यांनी केला होता. हेही वाचा: ५६ इंच छातीपेक्षा छातीवर किती मेडल आहेत त्याला अधिक महत्व- उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील एका जोडप्याला 1 लाख 20 हजार रुपयांना मूल विकले होते. 14 दिवसांचे हे मूल काही प्रक्रिया पूर्ण करायच्या राहिल्यात असे सांगून मुलाला परत नेण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येता या जोडप्याने रांची येथील बाल कल्याण समितीकडे हे प्रकरण नेले. त्यांच्या तक्रारीनंतरच हे प्रकरण समोर आले. हेही वाचा: सट्टेबाजीला अधिकृत करण्याची विधी आयोगाची शिफारस किमान पाच ते सहा नवजात अभ्रकांना मूल न होणाऱ्या जोडप्यांना विकण्यात आले. तसेच गेल्या वर्षांमध्ये अशा किती मुलांना विकण्यात आले आहे याचा आम्ही तपास घेत आहोत, असे पोलीस अधिकारी अमर कुमार यांनी सांगितले. 40 हजारांपासून ते 1 लाखांपर्यंत बालकांची किंमत लावली जाते. अनेकांनीच यासंदर्भात तक्रारी केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून आम्ही या संस्थेवर लक्ष ठेवून होतो. अखेर याप्रकरणात संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. हेही वाचा: साईंच्या चरणी 350 कोटींचं दान! किती आहे सोनं आणि चांदी?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







