सट्टेबाजीला अधिकृत करण्याची विधी आयोगाची शिफारस

सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचा वापर पुढे समाजपयोगी गोष्टींसाठी करता येऊ शकतो. आता फक्त घोड्यांच्या शर्यतीवर लावलेला सट्टा अधिकृत आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2018 08:47 AM IST

सट्टेबाजीला अधिकृत करण्याची विधी आयोगाची शिफारस

मुंबई, 06 जुलै: भारतात क्रिकेटसह अन्य खेळांमध्ये सट्टेबाजीला अधिकृत करण्याची शिफारस गुरूवारी विधी आयोगाने सरकारकडे केली आहे. तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कररचनेअंतर्गत जुगार आणि सट्टेबाजीवर कर लावण्यात यावा. यामुळे भारतात परकीय गुंतवणुकीतही वाढ होईल, असे आयोगाने अहवालात म्हटले आहे. खेळातून सट्टेबाजी, जुगार अशा गोष्टी पूर्णपणे बंद होणे शक्य नाही. यामुळे देशात मोठ्याप्रमाणात काळा पैसा तयार होतो. या गोष्टींवर पूर्णपणे निर्बंध घालणे सध्या तरी शक्य नाही. त्यापेक्षा सट्टेबाजी अधिकृत केली आणि त्यावर कर आकारला तर त्यातून चांगला महसूलही मिळू शकतो.

सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचा वापर पुढे समाजपयोगी गोष्टींसाठी करता येऊ शकतो. आता फक्त घोड्यांच्या शर्यतीवर लावलेला सट्टा अधिकृत आहे. या खेळात असलेले कौशल्य पाहून घोड्यांच्या रेसला सट्टेबाजीसाठी अधिकृत मान्यता दिली तशीच मान्यता इतर खेळांनाही देण्यात यावी. जर सट्टेबाजी अधिकृत केली तर ती शक्यतो कॅशलेस ठेवावी. तसेच व्यवहारात पॅनकार्ड आणि आधारकार्ड सक्तीचे करायचे. यामुळे आर्थिक व्यवहारात घोटाळा होणार नाही. संसदेला संविधानाच्या कलम २४९ आणि २५२ अंतर्गत यासंबंधी कायदा बनवता येऊ शकतो असे विधि आयोगाने अहवालात म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 08:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...