कोटा, 24 मार्च: आई आणि मुलाचं नातं जगातल्या कोणत्याच समीकरणात बांधता येत नाही. त्याबंधात खूप मोठी शक्ती असते. म्हणूनच आपल्या मुलाला/मुलीला काही अडचण असेल,तर तो/ती तिच्यापासून दूर असेल तरी तिला काही संवेदना होते,असे अनुभव अनेकांना येतात. याची प्रचिती येईल, अशी घटना राजस्थानच्या (Rajasthan) कोटा (kota news) शहरात नुकतीच घडली.
आपल्या मुलाची आठवण आली,म्हणून आईने whatsapp च्या स्टेटसवर (WhatsApp Status) मुलाचा फोटो ठेवला आणि 'आय मिस यू' (I Miss You) असं लिहिलं होतं. दुर्दैवाने त्यानंतर काही तासांतच मुलाच्या मृत्यूची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली. मोहितकुमार असं त्या मुलाचं नाव असून, तो जयपूरच्या (Jaipur) सांगानेर इथला रहिवासी होता.
कोटाच्या (Kota) श्रीनाथपुरम भागात भाड्याने राहून तो आरटीयू कॉलेजमधून इंजिनीअरिंग करत होता. इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याने मित्राच्या खोलीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. त्याचा मित्र खोलीत आल्यावर त्याला हे दृश्य दिसलं आणि त्याने पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी तातडीने येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला आहे.
एक वर्षाच्या चिमुरडीने दिला बापाला मुखाग्नी; 5 जवान शहीद झाल्याने देश हळहळला
रात्री उशिरापर्यंत मोहित त्याचा मित्र अंकित मीणा याच्या खोलीत प्रॅक्टिकलची तयारी करत होता. त्याच्यासोबत अंकितसह अन्य काही विद्यार्थीही होते. रात्री उशिरा त्याच्या फोनवर कोणाचा तरी कॉल आला होता. बोलता बोलता तो खोलीच्या बाहेर निघून गेला. त्यानंतर तो खोलीत आला आणि झोपायचं असल्याचं सांगून दुसऱ्या मित्राच्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळात मित्र त्याच्या खोलीत गेला,तेव्हा त्याला मोहित फासावर लटकत असलेला दिसला. मोहित आत्महत्या करू शकत नाही, असं त्याच्या आईचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्याच्या मृत्यूची चौकशी होण्याची मागणी त्याच्या आईने केली आहे.
मोहितचे वडील जोहरीलाल जयपूरच्या एका खासगी मेडिकल कंपनीत काम करतात. त्यांचा मोठा मुलगा मनीष त्रिपुरातून NIT ची तयारी करत आहे. लॉकडाउननंतर मोहित 24 फेब्रुवारीला कोटा येथे पोहोचला. अंकित मीणा या मित्राबरोबर 14 दिवस राहिल्यानंतर त्याने भाड्याने खोली घेतली होती.
महिलेने पत्नीशी शरीर संबंध ठेवले म्हणून नुकसान भरपाईसाठी पतीने खेचलं कोर्टात
रात्रीही त्याचंआई-वडिलांशी फोनवर बोलणं झालं होतं. बोलणं झाल्यानंतर आईने 'आय मिस यू' असं लिहून मोहितचा फोटो स्टेटसला ठेवला होता; पण आपल्या मुलाला कायमचंच गमवावं लागणार आहे, याची तिला काय कल्पना होती? यामुळेच मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर तिचा त्यावर विश्वासच बसला नाही. तिने असा विचारच केलान व्हता.
मोहितच्या खोलीत कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. याबद्दल तक्रार दाखल करून पोलीस तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.