Home /News /videsh /

महिलेने पत्नीशी शरीर संबंध ठेवले म्हणून नुकसान भरपाईसाठी पतीने खेचलं कोर्टात

महिलेने पत्नीशी शरीर संबंध ठेवले म्हणून नुकसान भरपाईसाठी पतीने खेचलं कोर्टात

वैवाहिक संबंधात कधी काय घडेल सांगता येत नाही. इथे जे घडलं ते वाचून तुम्ही थक्क व्हाल.

    टोक्यो, 24 मार्च : वैवाहिक संबंधांमध्ये अनेकदा विचित्र म्हणाव्या अशा गुंतागुंती निर्माण होतात. एका अशाच गुंतागुंतीच्या प्रकरणात निकाल देताना कोर्टानं महिलेला मोठा दंड ठोठावला आहे. हे प्रकरण जपानमध्ये घडलं आहे. यात एका महिलेनं दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्यानं कोर्टानं तिला तब्बल 110000 येन (70 हजार रुपये) दंड ठोठावला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार टोक्यो जिल्हा न्यायालयानं 16 फेब्रुवारीला 37 वर्षांच्या एका महिलेला ही रक्कम पीडितेच्या पतीला देण्याचे आदेश दिले आहेत. या महिलेवर आरोप होता, की तिनं पीडित महिलेच्या पतीच्या इच्छेविरुद्ध सेक्स संबंध बनवले होते. (Tokyo district court news) पतीनं दाखल केला होता खटला. जपानी वृत्तपत्र Asahi Shimbun नं दिलेल्या वृत्तानुसार, 39 वर्षांच्या पतीनं आरोपी महिलेविरुद्ध खटला दाखल करत आपल्या पत्नीसोबत तिनं बळजबरी सेक्स संबंध ठेवल्याचा दावा केला होता. पतीनं आपल्या याचिकेत सांगितलं, की त्याची पत्नी आणि आरोपी महिलेची भेट ऑनलाईन झाली होती. त्यानंतर हे दोघे मित्र झाले होते. (woman fined after having sex with another woman) कोर्ट म्हणालं, शांततेचा भंग झाला भरपाई द्या आरोपी महिलेनं कोर्टात म्हटलं, की तिच्या या कृतीनं लग्नाला धक्का पोचला नाही आणि हा एकनिष्ठतेचा भंग नाही. मात्र न्यायालयानं महिलेच्या पतीला भरपाई देण्याचा आदेश देत म्हटलं, की तिच्या या कृत्यामुळं शांततेचा भंग झाला. यात बेईमानीचं कारण वैध ठरत नाही. (court fines woman due to sex with woman) हेही वाचा 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, अवघ्या 64 दिवसांत न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशी न्यायालयाच्या या निर्णयाची सगळ्या जपानमध्ये चर्चा होते आहे. एक वर्षापूर्वीही टोक्योच्या हायकोर्टात असंच एक प्रकरण समोर आलं होतं. यात एका महिलेला तिच्या महिला जोडीदाराला धोका दिल्याप्रकरणी दंड भरण्याचा आदेश देण्यात आला होता. (japan woman fined for sex with woman) जपानमध्ये समलैंगिकता मान्य नाही सांगितलं जात आहे, की हे दाम्पत्य मागील सात वर्षांपासून एकत्र राहत आहे. त्यांनी अमेरिकेत लग्न केलं होतं आणि आता त्यांना मूलही होणार होतं. काही वर्षांपूर्वी या देशाच्या एका जिल्हा न्यायालयानं निर्णय दिला होता, की समलिंगी जोडप्यांच्या लग्नाला परवानगी नाकारणं संविधानविरोधी आहे. हेही वाचा भावानं निवडणूक लढवण्यास मनाई केल्यानं तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं? मात्र नुकताच जपानच्या एका न्यायालयानं समलैंगिक जोडप्यांच्या लग्नाला संविधानविरोधी म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयानं तिथली समलैंगिक जोडपी आता लपूनछपून जगत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Court, Japan, Sexual relationship

    पुढील बातम्या