मराठी बातम्या /बातम्या /देश /अवघ्या 1 वर्षाच्या चिमुरडीने दिला बापाला मुखाग्नी; नक्षली हल्ल्यात 5 जवान शहीद झाल्याने देश हळहळला

अवघ्या 1 वर्षाच्या चिमुरडीने दिला बापाला मुखाग्नी; नक्षली हल्ल्यात 5 जवान शहीद झाल्याने देश हळहळला

Chhattisgarh Narayanpur Naxal Attack: शहीद जवानांच्या मृतदेहाला वरिष्ठ अधिकारी खांदा देत असतानाचा क्षण भावुक करणारा होता.

Chhattisgarh Narayanpur Naxal Attack: शहीद जवानांच्या मृतदेहाला वरिष्ठ अधिकारी खांदा देत असतानाचा क्षण भावुक करणारा होता.

Chhattisgarh Narayanpur Naxal Attack: शहीद जवानांच्या मृतदेहाला वरिष्ठ अधिकारी खांदा देत असतानाचा क्षण भावुक करणारा होता.

नारायणपूर, 24 मार्च : छत्तीसगडच्या नारायणपूर इथं नक्षलवादी हल्ल्यात मंगळवारी 5 जवान शहीद झाले. त्यांचे शव बुधवारी त्यांच्या जन्मगावी नेण्यात आले. यामध्ये काकेर इथले कॉन्स्टेबल सेवक सलाम यांचं शवही होतं. (Chhattisgarh Naxal Attack news)

जवानांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यात एक चिमुरडीही होती, केवळ 1 वर्षाची. तिच्या चेहऱ्यावर अगदी कसलेच भाव नव्हते. ती नुकतीच पपा म्हणायला शिकली होती. आता तिच्या बाबांना काळानं हिरावून नेलं आहे. मुलीनं आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला तेव्हा सर्वांचेच डोळे भरून आले. (Chhattisgarh naxal attack)

याआधी नारायणपूरमध्ये शहीद जवानांना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. या जवानांना कुमारपारा इथल्या रक्षित केंद्रात श्रद्धांजली दिली गेली. यादरम्यान बस्तर आयजी, PCC चीफ मोहन मरकाम आणि आमदार चंदन कश्यप उपस्थित होते. मृतदेह घेऊन जाण्याच्या दरम्यान PCC चीफ मोहन मरकाम यांनी खांदा दिला. यादरम्यान DGP डीएम अवस्थी आणि DG नक्षल ऑपरेशन्स अशोक जुनेजा पोचू शकले नाहीत. (Chhatisgarh Martyrs jawans in Naxal Attack)

DGP डीएम अवस्थी आणि DG नक्षल ऑपरेशन्स अशोक जुनेजा हे बीएसएफच्या हेलिकॉप्टरनं नारायणपूरसाठी निघाले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग रायपूरमध्ये करावी लागली. दुपारी अधिकारी तिथे पोचले आणि घटनास्थळाचा दौरा करून अधिकाऱ्यांसह बैठक केली. त्यांनी अधिकाऱ्यांना सावधगिरी बाळगायला सांगितली. सोबतच येत्या दिवसांत आंतरराज्यीय ऑपरेशन्स लॉन्च करण्याबाबतही ते बोलले. (Naxals Attack DRG Jawan bus)

हल्ल्यात 12 जवान जखमी

जिल्ह्यापासून जवळ 40 किलोमीटर दूर कडेनार इथं मंगळवारी नक्षलवाद्यांनी IED चा स्फोट घडवला. डीआरजी जवानांची बस यात नक्षलवाद्यांनी उडवली. हा स्फोट इतका मोठा होता, की ही बस 30 फूट वर उडाली. हायटेंशन तारेला स्पर्श करून ती खाली पडली. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले. 12 जवान घायाळ झाले. यातील तिघांची अवस्था गंभीर आहे. त्यांच्यासोबत 7 जवानांना रायपूरला रेफर केलं गेलं आहे. शहीद जवानांचं पोस्टमार्टम बुधवारी केलं गेलं.

जन्मगावी पोलीस अधिकारीही देतील सलामी आणि पुष्पांजली

पोलीस लाइनमध्ये गार्ड ऑफ ऑनर दिला गेल्यानंतर शहीद जिवांचे मृतदेह त्यांच्या जन्मगावी नेले गेले. तिथं पोचल्यावर सामान्यांच्या दर्शनासाठी मृतदेह ठेवले जातील. पोलिस दलातील स्थानिक उच्चपदस्थ अधिकारी शहीद जवानांना सलामी देत पुष्पांजली अर्पण करतील.

हेही वाचा संतापजनक! फ्लॅटवर मित्राला बोलावणं बेतलं जीवावर; घरमालकाने केली हत्या

हे जवान झालेत शहीद

प्रधान आरक्षक पवन मंडावी, गाव बहिगाव

प्रधान आरक्षक जयलाल उईके, गाव कसावाही

आरक्षक सेवक सलाम, कांकेर

आरक्षक चालक करण देहारी, अंतागढ, जिल्हा कांकेर

सहायक आरक्षक विजय पटेल, नारायणपूर

हेही वाचा धुळ्यात महिला सावकाराची दबंगगिरी; दाम्पत्याला केली बेदम मारहाण

1 महिन्यापासून सक्रिय आहेत नक्षलवादी

शांती संवादाच्या  प्रस्तावाआडून नक्षलवादी मागील एक महिन्यापासून सतत सक्रिय आहेत. बस्तरच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांनी तोंड वर काढलं आहे. सतत हल्ले होत आहेत आणि पोलिसांच्या मदतीला गेल्याचा संशय घेत सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या जात आहेत. इथवर, की एक वर्षानंतर नक्षलवादी पुन्हा केशकाल इथं पोचले आहेत. एक दिवस आधीच त्यांनी गोब्राहीनला जाणारा मार्ग आणि कुवे धबधब्याला जाणाऱ्या मार्गावर फलक लावून शासनाला विरोध दर्शवला होता.

First published:
top videos

    Tags: Chattisgarh, Naxal Attack