मुंबई, 15 जून : मोठी बातमी समोर येत आहे. घराला आग लागल्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. आगीची घटना घडली तेव्हा या मुलांचे वडील नवमी हे घराच्या बाहेर झोपले होते, तर घरात आई संगिता आणि त्यांचे पाच मुलं झोपले होते. घराला अचानक आग लागली, ही आग इतकी भीषण होती की आई आणि मुलांना बाहेर पडता आलं नाही. या घटनेत त्यांचा जळून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्रिशमन दल घटनास्थळी दाखल झाले, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. या अग्नितांडवात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. कुशीनगर जिल्ह्यातील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की., ही घटना उत्तर प्रदेशमधल्या कुशीनगर जिल्ह्यातील आहे. रामकोला पोलीस ठाण्यातर्गंत येणाऱ्या उर्दहा गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि तिच्या पाच मुलांचा समावेश आहे. बुधवारी रात्री या मुलांचे वडील नवमी हे आपल्या कुटुंबासोबत जेवन करून झोपले होते. मात्र गरमी जास्त असल्यानं नवमी हे घराच्या बाहेर झोपले तर घरात नवमी यांची पत्नी संगिता आणि त्यांची पाच मुले झोपली होती. मात्र रात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून नवमी झोपेतून जागे झाले. त्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशिरा झाला होता.
गोणीत ठेवला हुमेजानचा मृतदेह, सलमानला अटक केल्यावर उलगडलं सत्य, मुंब्रा पोलीसही चक्रावलेपोलिसांकडून चौकशीचे आदेश आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं आत अडकलेल्या व्यक्तिंना बाहेर पडता आलं नाही. या घटनेत सहा जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये संगिता 38 वर्ष, अंकित वय वर्ष 10, लक्ष्मीना वय वर्ष 9 रीता वय वर्ष 3, गीता वय वर्ष 2 आणि बाबू वय वर्ष एक अशा सहाजणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांकडून आग नेमकी कशामुळे लागली याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.