मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुवाहाटीतील लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितलं की, अद्याप 38 लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथकं तैनात करण्यात आली आहेत. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे. पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले पीटीआयच्या वृत्तानुसार लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी वॉल रडारचा वापर केला जात आहे. याशिवाय स्निफर डॉगचे पथकही तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत 13 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 18 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 6 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ते म्हणाले की, प्रादेशिक लष्कराचे 12 सैनिक आणि 26 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.
#WATCH | Another landslide hits near the tragedy site at Noney, Manipur. Details awaited.
— ANI (@ANI) July 2, 2022
(Video source: Manipur Mountaineering and Tracking Association) pic.twitter.com/Bf4gq0Sj7L
प्रवक्त्याने सांगितलं की, या अपघातात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) देखील आहे. हवाई दलाची दोन विमानं आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह १४ जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. मृतदेह पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला. दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनीही शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्टेशनजवळील भारतीय लष्कराच्या १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पजवळ बुधवार-गुरुवारी रात्री हे भूस्खलन झालं. इथे जिरीबाम ते इंफाळ दरम्यान रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. हे सैनिक त्याच्या संरक्षणासाठी तैनात होते.