जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले

पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले


वसमत शहरातील हे दोघे युवक मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते.

वसमत शहरातील हे दोघे युवक मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते.

वसमत शहरातील हे दोघे युवक मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनीष खरात, प्रतिनिधी हिंगोली, 02 जुलै :  पोलीस दलात भरती ( police practice ) होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आलेल्या दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीच्या सरावा दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे दोघांचा जणांचा मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीमध्ये (hingoli) घडली आहे. या दोन्ही तरुणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरामध्ये पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या दोन युवकांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिल भगवानराव आमले व गणेश परमेश्वर गायकवाड अशी मयत तरुणांची नावे असून हे दोघेही वसमत शहरातील रहिवासी आहेत. वसमत ते कवठा रोडवर आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ( शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह; शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं उत्तर ) वसमत शहरातील हे दोघे युवक मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीचा सराव करत होते. सकाळी वसमत शहरातून कवठा रोड परिसरात व्यायाम व शारीरिक कसरत करण्यासाठी जातात. आज सकाळी रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने अनिल भगवानराव आमले व गणेश गायकवाड यांना जोराची धडक दिली. गाडीच्या धडकेमुळे दोघांचाही घटनास्थळी जागीच मृत्यू झाला आहे. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पळ काढला. ( Devshayani Ekadashi 2022 :10 जुलैला आहे देवशयनी एकादशी; जाणून घ्या महत्त्व ) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणाचे मृतदेह हे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात