• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • monsoon 2021: मान्सून कमिंग सून, केरळात झाला दाखल

monsoon 2021: मान्सून कमिंग सून, केरळात झाला दाखल

प्रतिकात्मक फोटो.

प्रतिकात्मक फोटो.

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे

 • Share this:
  मुंबई, 03 मे: चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाला लवकरच आल्हाददायक दिलासा मिळणार आहे. मान्सूनचे (Monsoon) केरळात (Monsoon in Kerala) आगमन झाले आहे. पुढील काही दिवसांत त्याचे आगमन गोवा आणि तळकोकणात होणार आहे. अंदमान बेटांवर 21 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले. त्यामुळे मान्सूनला चाल मिळाल्याने गुरुवारी मान्सूनने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली. World Bicycle Day 2021: काजोलने दिल्या अनोख्या शुभेच्छा, शेयर केला मजेशीर VIDEO हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच 101 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात 106 टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. ओळखलत का यांना? सिनेसृष्टीतील 'ही' लोकप्रिय जोडी अशी पडली होती प्रेमात दुसरीकडे, महाराष्ट्राला मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाचा (Pre monsoon rain) तडाखा बसत आहे. आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट घोंघावत आहे. आज दुपारपासूनचं पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद लातूर आणि विदर्भात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाण्यालाही हवामान खात्याचा इशारा मुंबई आणि ठाणे परिसरातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. याठिकाणी आज पाऊस कोसळणार की नाही? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काल मुंबईसह ठाणे परिसरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांची पुरती धांदल उडाली होती.
  Published by:sachin Salve
  First published: