मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /World Bicycle Day 2021: काजोलने दिल्या अनोख्या शुभेच्छा, शेयर केला मजेशीर VIDEO

World Bicycle Day 2021: काजोलने दिल्या अनोख्या शुभेच्छा, शेयर केला मजेशीर VIDEO

आज सर्वत्र ‘जागतिक सायकल दिवस’(World Bicycle Day)  साजरा केला जात आहे.

आज सर्वत्र ‘जागतिक सायकल दिवस’(World Bicycle Day) साजरा केला जात आहे.

आज सर्वत्र ‘जागतिक सायकल दिवस’(World Bicycle Day) साजरा केला जात आहे.

मुंबई, 3 जून-  आज सर्वत्र ‘जागतिक सायकल दिवस’(World Bicycle Day)  साजरा केला जात आहे. याचं औचित्य साधत बॉलिवूड अभिनेत्री(Bollywood Actress) काजोलने (Kajol)  खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. काजोलने आपल्या सोशल मीडियावर आपला आणि शाहरुख खानचा एक व्हिडीओ शेयर केला आहे. आणि खाली कॅप्शन लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. युजर्स या व्हिडीओवर विविध कमेंट करत आहेत.

जागतिक सायकल दिवसाच्या निमित्ताने काजोलने ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटातील एक सीन चाहत्यांशी शेयर केला आहे. यामध्ये अभिनेत्री काजोल आणि शाहरुख खान सायकलिंग करत आहेत. काजोलची सायकल अगदी लुडबुडत असते.  आणि शेवटी काजोल सायकल घेऊनचं पडते. असा हा मजेशीर व्हिडीओ आहे. या व्हिडीओमुळे त्या काळातील आठवणी ताज्या झाल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Kajol Devgan (@kajol)

युजर्सनी यावर विविध कमेंट सुद्धा दिल्या आहेत, कोणी काजोलच्या अभिनयाचं कौतुक केल आहे. तर कोणी काजोल आणि शाहरुखच्या जोडीचं कौतुक केलं आहे. तर कोणी व्हिडीओमुळे कुछ कुछ होता है च्या आठवणी ताज्या झाल्याचं म्हटलं आहे. तसेच काजोलला एव्हरग्रीन अभिनेत्रीसुद्धा म्हटलं आहे.

(हे वाचा; अंकिता लोखंडेनं सोशल मीडियावरून घेतला ब्रेक; चाहते म्हणाले... )

सन 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये काजोल शाहरुख सोबत सलमान खान, राणी मुखर्जी, सना सईद, फरीदा जलाल आणि अनुपम खैर असे कलाकार होते. करण जोहरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.

(हे वाचा:बँडस्टँडचा फेरफटका पडला महागात; अखेर टायगर श्रॉफवर गुन्हा दाखल  )

तसेच काजोल आणि शाहरुखची जोडी खुपचं पसंत केली जाते. त्यामुळे त्यांचे प्रत्येक चित्रपटसुद्धा सुपरहिट ठरत होते. ‘कुछ कुछ होता है चा हा सीन बघून सोशल मीडियावर चाहत्यांनी पुन्हा एकदा आठवणींना उजाळा दिला आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment