मराठी बातम्या /बातम्या /देश /

Modi@8 : पंतप्रधान मोदी म्हणजे पोलादी इच्छाशक्तीचे नेते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात..

Modi@8 : पंतप्रधान मोदी म्हणजे पोलादी इच्छाशक्तीचे नेते, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व शक्तीने नव्हे, तर आपल्या विविधतेच्या बळावर उदाहरणाद्वारे केले आहे, ज्यांनी दाखवून दिले की लोक आदर्शांनी एकत्र येऊ शकतात, असं कौतुकाचे शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व शक्तीने नव्हे, तर आपल्या विविधतेच्या बळावर उदाहरणाद्वारे केले आहे, ज्यांनी दाखवून दिले की लोक आदर्शांनी एकत्र येऊ शकतात, असं कौतुकाचे शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व शक्तीने नव्हे, तर आपल्या विविधतेच्या बळावर उदाहरणाद्वारे केले आहे, ज्यांनी दाखवून दिले की लोक आदर्शांनी एकत्र येऊ शकतात, असं कौतुकाचे शब्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 1 जून : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी येऊन आता 8 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा लेखाजोखा केला जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील मोदी यांच्याविषयी विशेष लेख लिहला आहे. ते म्हणाले, की आशा आणि बदल या दोन गोष्टींचं आश्वासन देऊन नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) 2014 मध्ये पंतप्रधानपदी निवडून आले. गेल्या आठ वर्षांत त्यांनी या गोष्टी दिल्या आहेत. त्यांनी नव्या भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्यांचे विचार, कृती आणि दृष्टिकोन यांच्या साह्याने त्यांनी विकास आणि प्रगतीच्या पथावर आपल्या देशाचं यशस्वीरीत्या सारथ्य केलेलं आहे. त्यांच्या जबरदस्त कार्यामुळे भारताला जागतिक राजकारणात (Global Politics) प्रभावी स्थान प्राप्त झालं आहे. 'एक भारत, श्रेष्ठ भारत' हे भारताने सत्यात उतरवलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि क्रिएटिव्हिटी यांमध्ये याचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे भारताने अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीतही अशक्य ते शक्य करून दाखवलं आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर प्रगतीसाठी ते प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन करतात. त्यामुळे नवभारताच्या उभारणीमध्ये 135 कोटी भारतीयांच्या भावना आणि इच्छा-आकांक्षांचं प्रतिबिंब दिसतं. गुजरातच्या पश्चिमेकडच्या वडनगर (Vadnagar) या छोट्या शहरात जन्मलेल्या या व्यक्तीचा जन्मापासून पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास आणि आव्हानांचं संधीत रूपांतर करण्याची त्यांची क्षमता या गोष्टी 135 कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीचा पाया बनल्या आहेत. जीवनाच्या गुरुकुलात शिकलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले नरेंद्र मोदी माननीय अटलजींना श्रद्धास्थान मानतात. त्यांची विचारसरणी, त्यांची कामाची पद्धत, त्यांचा दृष्टिकोन, राष्ट्रउभारणीची त्यांनी हाती घेतलेली मोहीम या गोष्टी गेली 22 वर्षं सारा देश पाहतो आहे. गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी Vibrant Gujarat सादर केला. तसंच, विकास आणि सुप्रशासनाचं गुजरात मॉडेल देशासमोर उभं केलं. ते मॉडेल अनेक राज्यांच्या विकासासाठी रोल मॉडेल बनलं. स्वातंत्र्यानंतर देशाला Communalism च्या धोरणाचा, तसंच तुष्टीकरणाच्या (Appeasement) राजकारणाचा फटका बसला. सर्वसमावेशक नेतृत्व भारताला लाभलं नाही. समाजातल्या शोषित, दुर्लक्षित व्यक्ती विकासासाठी दीर्घ काळ प्रतीक्षेत राहिल्या. विरोधाभास म्हणजे दुसरीकडे, जागतिक महासत्ता बनण्याचं स्वप्नही आपण पाहत आलो आहोत.

Modi@8: देश तसा वेश! मोदींनी एकात्मतेचा संदेश द्यायला कसे बदलले पेहराव पाहा PHOTO

स्वच्छता हे भारताच्या विकासाचं प्रभावी साधन ठरू शकेल, असा विचार कोणी केला होता का? महात्मा गांधी यांच्यानंतर तशी कल्पना कोणीच केली नव्हती; मात्र, गेल्या सात-आठ वर्षांत ते सत्यात उतरत असल्याचं सारा देश पाहत आहे. 'गरिबी हटाओ' ही थीम गेली अनेक वर्षं राबवली जात आहे; गरिबी मात्र कायम आहे. कारण केवळ घोषणा दिल्या गेल्या, काम काहीच झालं नाही. या दिशेने ठोस सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. जन धन, आधार आणि मोबाइल या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांना होत आहे. त्याचे चांगले परिणाम सर्वांसमोर आहेत. आपल्या देशात शांततापूर्ण सामाजिक-आर्थिक क्रांती सुरू झाली आहे. सर्वांना घरं, सर्व घरांना वीजपुरवठा, प्रत्येक हाताला काम, सर्वांना शिक्षण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छता ही साऱ्या भारतीयांची स्वप्नं पूर्ण करण्याची ताकद त्यांच्या इच्छाशक्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे केलं आहे आणि ते खरोखरच शतकातले उत्तम नेते आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी समाजाच्या आणि राज्याच्या विकासासाठी पंचामृत, सुजलाम सुफलाम, चिरंजीवी, मातृवंदना, कन्या कलवणी आदी योजना राबवल्या. त्या आता नवभारताच्या उभारणीतही हातभार लावत आहेत. मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, बेटी बचाओ-बेटी पढाओ यांसारख्या योजना नवभारताच्या उभारणीच्या प्रवासातले मैलाचे दगड ठरत आहेत. नोटाबंदी, जीएसटी यांसारख्या ऐतिहासिक उपाययोजना आर्थिक सुधारणेसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत विकसित होण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या सुवर्ण चतुष्कोन (Golden Quadrilateral) आणि नदीजोड योजना (River Linking) पुढे नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. आपले सागरतटदेखील विकासाचे प्लॅटफॉर्म्स बनावेत या हेतूने सागरमाला प्रकल्प (Sagarmala) सुरू करण्यात आला आहे. PM Modi नी 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटींची दिली भेट नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्त्व कणखर आहे. 'एक भारत-श्रेष्ठ भारत'चे ते कुशल कारागीर आणि कुशल मार्गदर्शक आहेत. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर केलेल्या टीकेमुळे ते कधीही विचलित झाले नाहीत. उलट, देशहितासाठीचे निर्णय ठोस पद्धतीने घेण्यास त्यांना त्यामुळे अधिकच बळ मिळालं. 2014नंतर देशाच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात झालेला क्रांतिकारी बदल हा याचा पुरावा आहे. राष्ट्रीय राजकारणात प्रथमच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राष्ट्रवादाला (Spiritual Nationalism) स्थान मिळालं आहे आणि सारं जग भारताकडे कौतुकाने पाहत आहे. याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यक्तिमत्त्व आणि नेतृत्व या गोष्टींना जातं. कित्येक शतकांपूर्वीची भगवान श्रीरामांची कीर्ती, तसंच महात्मा बुद्धांचे संदेश आदी बाबी आजही अनेक देशांच्या परंपरा आणि जीवनशैलीतून प्रतीत होतात. त्या मितींना स्पर्श करण्यात 2014नंतरच्या कालावधीत सांस्कृतिक राष्ट्रवाद यशस्वी झाला आहे. जपानचे पंतप्रधान भारतात येता आणि गंगामातेच्या आरतीला उपस्थित राहतात, ही साधी गोष्ट नाही. अरब देशात उभं राहत असलेलं भव्य मंदिर हे सर्वसाधारण मुत्सद्देगिरीचं उदाहरण असू शकत नाही. कोणत्याही निर्णयाप्रत येण्याआधी जगातले शक्तिशाली देश भारताकडे पाहतात. या साऱ्या भारतासाठी अभिमानाच्या गोष्टी आहेत. हे सारं सर्वसाधारण मुत्सद्देगिरीमुळे घडू शकलं नसलं. पंतप्रधानांनी देशहितासाठी खूप मोठे निर्णय घेतले आहेत; मात्र एखाद्या निर्णयाचे फायदे देशवासीयांना कळले नाहीत किंवा त्यांना समजावण्यात आपण कमी पडलो, असं वाटलं तर तो निर्णय मागे घेण्यासही ते मागेपुढे पाहत नाहीत. जनभावनेबद्दल आदर आणि लोकशाहीचं सौंदर्य यांचा हा मिलाफ आहे. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते जनहिताची कामं यशस्वीरीत्या करतच राहिले. News18 Exclusive | Modi@8: कृषी क्षेत्राच्या सोनेरी वाटचालीसाठी मोदी सरकार कटिबद्ध - केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर 2020-21मध्ये देशाला कोविड-19च्या भयाण संकटाला सामोरं जावं लागलं. तेव्हा जीव आणि उपजीविका या दोन्हींचे प्रश्न उपस्थित झालेल्या प्रत्येक भारतीयाला तर भारत सरकारने संरक्षण पुरवलंच; पण जगातल्या अन्य अनेक देशांनाही मदत केली. अनेक देशांना कोरोना प्रतिबंधक लशींचा पुरवठा करून Vaccine Friendship चं उदाहरण जगासमोर ठेवलं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये (International Politics) त्यांनी भारताचं स्थान इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे, की भारतीय आणि अन्य देशांत राहणाऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. आज जग ज्या संकटातून जात आहे, त्यावर उपाय म्हणून, तसंच जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी जगातले सारे शक्तिशाली देश भारताकडे पाहत आहेत. कलम 35 ए आणि कलम 370द्वारे काश्मीरला दिलेला विशेष दर्जा हा 'एक भारत-श्रेष्ठ भारत'मधला महत्त्वाचा अडथळा होता. त्याबद्दल भारतीयांच्या मनात कायमच गिल्ट होता. पंतप्रधानांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे ही दोन्ही कलमं हटवून आता जम्मू, काश्मीर आणि लडाख या तिन्ही ठिकाणांना आता स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. म्हणजेच 'एक भारत-श्रेष्ठ भारत' ही गोष्ट सत्यात उतरली आहे. भगवान श्रीरामांचं भव्य मंदिर अयोध्येत आकार घेत असून, ते भारताच्या सांस्कृतिक विकासाचं प्रतीक ठरेल. काशी विश्वनाथ धामचं पुरातन वैभव आता काशीला आधुनिकतेसह पुन्हा प्राप्त झालं आहे. भारताच्या विकासाच्या गाथेत स्वच्छता हा एक महत्त्वाचा घटक समाविष्ट आहे. जीवनदायिनी गंगा नदी स्वच्छ होतेय आणि भारतीयांना अभिमानास्पद ठरतेय. रेशनसह केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ थेट मिळू लागल्यानंतर समाजातल्या तळागाळातले नागरिकही स्वाभिमानाने आणि स्वयंपूर्णतेने पुढे चालू लागले आहेत. देशाच्या विकासात स्त्री-शक्ती आदराने, सुरक्षिततेने आणि स्वावलंबीपणे सहभागी होत आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' यासह भारत आत्मनिर्भर बनत असल्याचं हे निदर्शक आहे. एकता, एकात्मता आणि सार्वभौमत्व यांचा मजबूत पाया याला आहे. भारत एकजिनसी, कणखर, आत्मनिर्भर बनत असून, इतिहासाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदीजींनी भारताचं नेतृत्व बळाने नव्हे, तर आदर्श उदाहरण उभं करून केलं आहे. आपल्या विविधतेतली क्षमता ओळखून, आदर्शांनी नागरिक एकत्र येऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिलं. ते खरोखरच पोलादी इच्छाशक्तीचे नेते आहेत.
First published:

Tags: Pm modi, Yogi Aadityanath

पुढील बातम्या