नवी दिल्ली, 31 मे : पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Sanman( Nidhi) 11व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 31 मे 2022 रोजी 10 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी farmer) कुटुंबांना 21,000 कोटी रुपयांहून अधिकची सन्मान निधी रक्कम त्यांच्या बँक खात्यांमध्ये DBT द्वारे हस्तांतरित केली आहे. (PM Kisan Samman Nidhi 11th Installment Updates)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिमला येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ आयोजित कार्यक्रमादरम्यान पीएम किसान सन्मान निधीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. निधी हस्तांतरित करण्याबरोबरच, पंतप्रधान मोदींनी लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद देखील साधला.
असे चेक करा खात्यात पैसे जमा झालेत की नाही
आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेट्स स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही.
हे ही वाचा : TET Exam Scam: टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेंची जामिनावर सुटका
आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेट्स पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेट्स जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.
मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.
हे ही वाचा : धक्कादायक! पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणासोबत घडला विचित्र प्रकार
पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी ‘पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन’ या वेबसाईटवर करता येते.
गरीब कल्याण संमेलन म्हणजे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यामुळे देशभरातील राज्यांच्या राजधानी, जिल्हा मुख्यालये आणि कृषी विज्ञान केंद्रांमध्ये या अनोख्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी कार्यक्रमांबाबत लोकांचे मत जाणून घेण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.