नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : केंद्र सरकारने आज पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलाचा मसुदा जाहीर केला आहे. हा मूळ मसुदा ज्यासाठी आहे त्यापेक्षा त्यातील दोन शब्दांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोन शब्दांचा वापर अशा मसुद्यात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. मसुद्यातील या दोन शब्दांचा वापर म्हणजे मोदी सरकारने टाकलेलं एक क्रांतिकारक पाऊलच म्हणावं लागेल. सरकारी विधेयकाच्या मसुद्यात केलेला या शब्दांचा वापर म्हणजे महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. कारण हे दोन शब्द आहेत She आणि Her.
तुम्ही जर सरकारी कागदपत्रं पाहिली असतील तर त्यामध्ये सामान्यपणे व्यक्तीचा उल्लेख करताना He किंवा His शब्दाचा उल्लेख केला जातो. म्हणजे मग ती महिला असो वा पुरुष. प्रत्येकासाठी सर्वसामान्यपणे तो, त्याचे, त्याला असाच उल्लेख केला जातो. पण पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिलाच्या ड्राफ्टमध्ये मात्र He आणि His कुठेच दिसत नाही आहे. त्याजागी She आणि Her चा उल्लेख करण्यात आला आहे.
या विधेयकाच्या मसुद्यातील व्याख्या खंडात म्हटलं आहे, "या अधिनियमात ..... कोणत्याही व्यक्तीसाठी सर्व लिंगासाठी सर्वनाम her आणि she चा वापर करण्यात आलं आहे"
या मसुद्यातील काही वाक्ये
एक डेटा प्रिन्सिपल आपला पर्सनल डेटाच्या प्रोसेसिंगला तेव्हाच परवानगी देऊ शकते, जर अशा प्रोसेसिंगची गरज असेल. हे वाक्य इंग्रजीत असं आहे की, “A Data Principal is deemed to have given consent to the processing of her personal data if such processing is necessary.”
अशा स्थितीत डेटा प्रिन्सिपल आपल्या इच्छेने डेटा फिड्युशरीला आपला पर्सनल डेटा देते आणि ती असा वैयक्तिक डेटा प्रदान करेल अशी वाजवी अपेक्षा आहे. या वाक्यातही डेटा प्रिन्सपल म्हणजे डेटा देणाऱ्यासाठी her आणि she चा उपयोग करण्यात आला आहे.
या वाक्यांच्या स्पष्टीकरणासह उदाहरण देण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे. "रेस्टॉरंटमध्ये एक टेबल बुक करण्यासाठी 'अ' डेटा फिड्युशरीसोबत आपलं नाव आणि मोबाईल नंबर शेअर करते. बुकिंग किंवा रिझर्व्हेशनच्या कन्फर्मेशनसाठी 'अ' डेटा फिड्युशरीला आपलं नाव आणि मोबाईल नंबर ठेवण्यासाठी परवानदी देते. या पूर्ण वाक्यातही her आणि she वापरण्यात आलं आहे."
Seeking your views on draft Digital Personal Data Protection Bill, 2022.
Link below: https://t.co/8KfrwBnoF0 — Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) November 18, 2022
जे आजवर कुणीच केलं नाही ते मोदी सरकारने केलं आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांना हळूहळू मिळत असलेल्या समान हक्काच्या दिशेने टाकलेलं हे आणखी एक पाऊल आहे, असं म्हणावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Modi government, Narendra modi, Pm modi