मुंबई, 18 नोव्हेंबर : वसई येथील श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. लिव्ह-इन पार्टनरचा निर्घृण खून करून तिच्या शरीराचे तुकडे करून आरोपी आफताबने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आफताबने केलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आता पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. आफताबच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी पोलीस नार्को टेस्ट करणार आहेत. यासाठी न्यायालयाने परवानगी दिली. पण ही टेस्ट नेमकी असते कशी व ती केल्यानंतर गुन्हेगार खरं बोलतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’नं वृत्त दिलं आहे.
दिल्लीत घडलेल्या श्रद्धाच्या हत्याकांडाने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. पोलीस तपासात दरदिवशी नव्या गोष्टी समोर येत आहेत. श्रद्धाचा खून करणारा तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबची पोलीस कोठडी पाच दिवसांसाठी वाढवून देण्यात आली. या प्रकरणात आफताबच्या नार्को टेस्टला परवानगीही दिली गेली आहे. या टेस्टमध्ये मोठमोठे गुन्हेगारही सत्य बोलायला लागतात आणि बरेच आरोपी तर याला घाबरत असल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. या टेस्टमध्ये आरोपी सत्य कसं बोलायला लागतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
कशी करतात नार्को टेस्ट?
नार्को टेस्टमध्ये गुन्हेगारला इंजेक्शनद्वारे ट्रूथ ड्रग दिलं जातं. यामुळे ती व्यक्ती अर्धी बेशुद्ध होते. व्यक्ती जेव्हा अर्धी बेशुद्ध असते तेव्हा तिला प्रश्न विचारले जातात या वेळी ती शक्यतो खोटं बोलत नाही असं या आधी दिसून आलंय. ही गुन्ह्याचा तपास करायची विज्ञानाधारित पद्धत आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी व्यक्तीच्या बोटांवर मशीन लावलं जातं. व्यक्तीच्या शरीरात होणारे बदल या मशीनच्या माध्यमातून नोंदवले जातात. नार्को टेस्टमध्ये आफताबने केलेले दुष्कृत्य समोर येईल. नार्को टेस्टच्या माध्यमातून श्रद्धा खून प्रकरणाचं सत्य समोर येण्याची आशा आहे.
हे वाचा - श्रद्धासोबत रिलेशनमध्ये असताना 20 मुलींना डेट करत होता आफताब, अॅप उलगडणार रहस्य
ही करण्याची परवानगी कोणाला?
गुन्हेगाराने केलेला गुन्हा हा कुठल्या पद्धतीने केला आहे हे जाणून घेण्यासाठी नार्को टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे. ही टेस्ट तज्ज्ञांच्या टीममार्फत केली जाते. या टीममध्ये डॉक्टर, फॉरेन्सिक एक्स्पर्ट, पोलीस तपास अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी असतात. कुठल्याही आरोपीची नार्को टेस्ट करण्याच्या आधी एक्स्पर्ट टीम निवडली जाते.
हे वाचा - पुणे: मैत्री करून सोबत फोटो काढले; मग धमकी देत तरुणीसोबत संतापजनक कृत्य
न्यायालयाने दिली टेस्टसाठी परवानगी
श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या आफताबची नार्को टेस्ट करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या परवानगीविना कुठल्याही गुन्हेगाराची नार्को टेस्ट करता येत नाही. एखाद्या पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने न्यायालयाच्या परवानगीविना अशा प्रकारची टेस्ट केल्यास तो गुन्हा मानण्यात येतो. आरोपी कितीही मोठा असला तरी नार्को टेस्टसाठी न्यायालयाचीच परवानगी आवश्यक असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime branch, Crime news, Delhi latest news