जाहिरात
मराठी बातम्या / देश / भाजप बहुमताच्या जवळ, ईडीचा शिवसेनेला मोठा धक्का, मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट TOP बातम्या

भाजप बहुमताच्या जवळ, ईडीचा शिवसेनेला मोठा धक्का, मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट TOP बातम्या

भाजप बहुमताच्या जवळ, ईडीचा शिवसेनेला मोठा धक्का, मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट TOP बातम्या

Today News : राज्यासह देशविदेशातील महत्वाच्या घडामोडी अगदी काही मिनिटांत जाणून घ्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 जून : राज्यसभेतील चूक विधान परिषदेत होऊ नये म्हणून महाविकास आघाडीने मोठी फिल्डींग लावली होती. मात्र, तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने यश खेचून आणले आहे. या निवडणुकीत फक्त भाजपचा विजयच झाला नाही तर ते बहुमतापासून आता अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपले आहेत. सर्व प्रकारची काळजी घेऊनही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. पर्यवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स (Ed summons to Anil Parab) पाठवले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विधानपरिषद निवडणुकीची Inside story विधान परिषद निवडणुकीचा (MLC Election) निकाल म्हणजे  महाविकास आघाडी (MLC Election Result) सरकारसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. आतापर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवारांकडून विजयाची हमी दिली जात होती. मात्र, प्रत्यक्षात आघाडी सरकारला त्यांचं सरकार असूनही आपली मतं टिकवून ठेवता आलेली नाही, असंच काहीचं चित्र आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. BJP बहुमतापासून हाकेच्या अंतरावर विधान परिषद निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) भाजपने (BJP) महाविकासआघाडीला (Maha vikas Aghadi) जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत फक्त भाजपचा विजयच झाला नाही तर ते बहुमतापासून आता अवघ्या काही अंतरावर येऊन ठेपले आहेत. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली! राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. आमदारांना फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयीपासून मतदान कसं करायचं? इथपर्यंत तालीम देण्यात आली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेनेला मोठा धक्का! विधान परिषद निवडणुकीचा अटीतटीचा सामना सुरू असताना शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते आणि पर्यवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीने पुन्हा एकदा समन्स (Ed summons to Anil Parab) पाठवले आहे. ईडीने दुसऱ्यांदा अनिल परब यांना समन्स पाठवले असून आज चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. सांगलीतील सामुहिक आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची बातमी मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे (9 People Committed Suicide in Sangli). या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. मुंबईत IMD चा ऑरेंज अलर्ट; जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहर आणि उपनगरात मध्यम स्वरुपाच्या पावसासह आकाश ढगाळ राहील. काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट जारी केल्याची माहिती हवामान विभागाने आपल्या दैनंदिन बुलेटिनमध्ये दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा. हायकोर्टाने का दिली अल्पवयीन विवाहास मान्यता? 16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुस्लिम तरुणी तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास पात्र आहे, असा निकाल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab & Haryana Highcourt) सोमवारी (20 जून) दिला आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात