Home /News /maharashtra /

सांगलीतील सामुहिक आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची बातमी; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा

सांगलीतील सामुहिक आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची बातमी; पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा

काही वर्षांपूर्वी दिल्लीतही एका कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती.

    सांगली, 20 जून : मिरज (Miraj News) तालुक्यातील म्हैसाळ येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे (9 People Committed Suicide in Sangli). या सर्वांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृतांचे शवविच्छेदन सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंब आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या हाती लागली आहे. तर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. सुसाइड नोटमध्ये काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. त्यादृष्टीने तपासासाठी एक विशेष पथक नियुक्त करण्यात आल्याचं पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितलं. मात्र या आत्महत्यांमागे नेमकं कोणतं कारण आहे, ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आलं आहे. दरम्यान डॉक्टर माणिक वनमोरे यांच्यावर प्रचंड कर्ज असल्याने आर्थिक विवंचनेतून वनमोरे कुटुंबाने आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू आहे. नेमकं काय घडलं? आज नरवाड रोड अंबिका नगर चौंडजे मळा आणि हॉटेल राजधानी कॉर्नर या दोन ठिकाणी 9 जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टर माणिक यल्लप्पा वनमोरे आणि त्यांचा शिक्षक भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे यांच्यासह दोघांच्या आई, पत्नी आणि मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. डॉ माणिक यल्लप्पा वनमोरे पत्नी रेखा माणिक वनमोरे,आई आकताई यल्लप्पा वनमोरे, मुलगी प्रतिमा माणिक वनमोरे , मुलगा आदित्य माणिक वनमोरे, पुतण्या शुभम पोपट वनमोरे राजधानी हॉटेलजवळ तर दुसरीकडे घरात डॉ.माणिक यांचा भाऊ पोपट यल्लप्पा वनमोरे, संगीत पोपट वनमोरे , मुलगी अर्चना पोपट वनमोरे यांचे मृतदेह आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंदरे यांनी फौजफाटा घेऊन भेट देत पंचनामा केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sangali, Suicide

    पुढील बातम्या