जाहिरात
मराठी बातम्या / देश / मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, हायकोर्टाने का दिली अल्पवयीन विवाहास मान्यता?

मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, हायकोर्टाने का दिली अल्पवयीन विवाहास मान्यता?

मुस्लिम मुली 16 व्या वर्षी करू शकतात लग्न, हायकोर्टाने का दिली अल्पवयीन विवाहास मान्यता?

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय न्यायाधीशांच्या खंडपीठाने अल्पवयीन मुस्लिम मुलीच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले आहे. मुस्लिम मुली 16 व्या वर्षी त्यांच्या स्वेच्छेने विवाह करू शकतात, असं न्यायालयाने म्हटलं आहे.

    चंडीगड, 20 जून : 16 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुस्लिम तरुणी तिच्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास पात्र आहे, असा निकाल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab & Haryana Highcourt) सोमवारी (20 जून) दिला आहे. हा निकाल देतानाच हायकोर्टाने 16 आणि 21 वर्षं वय असलेल्या एका मुस्लिम जोडप्याला (Muslim Couple) त्यांच्या कुटुंबीयांपासून संरक्षणही दिलं आहे. न्या. जसजितसिंग बेदी (Justice JasjitSingh Bedi) यांच्या एकसदस्यीय पीठाने हा निर्णय दिला. ‘इंडिया टुडे’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. मुस्लिम मुलीच्या लग्नासाठी मुस्लिम पर्सनल लॉ (Muslim Personal Law) पाळणं आवश्यक असतं, असं सांगून न्या. बेदी यांनी इस्लामिक शरिया कायद्याचा (Islamic Shariat Law) संदर्भ दिला. ‘सर दिनशाह फारदुनजी मुल्ला यांनी लिहिलेल्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मोहमदीयन लॉ’ (Principles of Mohammedan Law) या ग्रंथातल्या आर्टिकल 195 नुसार, दुसऱ्या क्रमांकाची याचिकाकर्ती 16 वर्षांवरची आहे. तसंच, पहिल्या क्रमांकाचा याचिकाकर्ता 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचा आहे. त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉनुसार दोघेही याचिकाकर्ते (Petitioners) एकमेकांच्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्यास पात्र (Competent) आहेत,’ असं न्या. बेदी यांनी म्हटलं आहे. हे सांगतानाच कोर्टाने आपण याचिकाकर्त्यांना वाटत असलेल्या भीतीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, अशी टिप्पणीही केली आहे. या याचिकाकर्त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवावी आणि कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेशही कोर्टाने पठाणकोटच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना (SSP of Pathankot) दिले आहेत. सिद्धू मूसेवाला हत्याकांडात मोठा खुलासा; आता या राजकीय नेत्याकडे संशयाची सुई ‘याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेविरोधात लग्न केले आहे, या कारणामुळे त्यांना भारतीय घटनेने (Indian Constitution) दिलेल्या मूलभूत अधिकारापासून (Fundamental Rights) त्यांना वंचित ठेवता येणार नाही,’ असंही न्या. बेदी यांनी सांगितलं. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2022 रोजी मुस्लिम प्रथा-परंपरा आणि रीतिरिवाजांनुसार (Muslim rites and ceremonies) त्यांचा विवाह झाला; मात्र या विवाहाला दोघांच्याही कुटुंबीयांचा विरोध असून, त्यांच्या परवानगीशिवाय विवाह केल्यामुळे त्यांनी दोघांना धमकावल्याचाही आरोप आहे. त्यामुळेच या जोडप्याला आता पोलीस संरक्षण देण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. मुस्लिम कायद्यानुसार, वयात येणं (Puberty) आणि सज्ञान होणं (Majority) या गोष्टी सारख्याच आहेत. त्यामुळे 15 वर्षी मनुष्य सज्ञान होतो, असं मानलं जातं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात