हैदराबाद 19 जुलै : तेलंगणातील (Telangana) अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे गोदावरी नदीने (Godavari River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, रविवारी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी भद्राचलममधील गोदावरी नदीचा हवाई दौरा केला. हवाई दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना ढगफुटीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. या संदर्भात लाईव्ह हिंदुस्थानने वृत्त दिलंय. खरं तर, ढगफुटी होणं हे नवीन नाही. पण यामागे षडयंत्र असल्याचं अनेक लोक सांगत आहेत, असं केसीआर म्हणाले होते. तसंच बाहेरच्या देशाकडून भारतात ढगफुटी (Cloud Bursting) घडवली जात आहे, असं त्यांनी सांगितलं. पण खरंच दुसरे देश एखाद्या देशात ढगफुटी घडवून आणू शकतात का, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. तर, त्याचं उत्तर आहे हो. एखादा देश दुसऱ्या देशात कृत्रिम पाऊस पाडू शकतो. अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. Gondia Rain Update : ‘या’ जिल्ह्यात पावसाचा कहर 11 लोक, 767 घरे, 39 जनावरे दगावली, शासनाची मदत नाहीच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव राज्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी गेले असता भारतात ढगफुटीच्या घटनांमागे परकीय शक्तींचं षड्यंत्र असल्याचं म्हणाले. यापूर्वीही लेह-लडाख आणि उत्तराखंडमध्येही (Uttarakhand) अशा घटना घडवून आणल्या गेल्या, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांना टीकेला सामोरे जावं लागतंय. भाजपा नेते कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी केसीआरवर निशाणा साधला. जर चीन किंवा पाकिस्तानने हे कृत्य केलं असेल तर केसीआर यांनीच त्यांना गुप्त विमानतळ उपलब्ध करून दिलं असेल, असं रेड्डी म्हणाले. ढगफुटी म्हणजे काय? कमी कालावधीत खूप कमी भागात जास्त पाऊस पडणं, याला ढगफुटी म्हणतात. पावसाचा वेग इतका असतो की पाण्याने भरलेली मोठी पिशवी आकाशात फुटल्यासारखं वाटतं. त्यामुळेच याला इंग्रजीत क्लाउडबर्स्ट आणि मराठीत ढगफुटी म्हणतात. या घटनेत 20 ते 30 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये एका तासापेक्षा कमी कालावधीत 100 मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडतो. vidarbha rain update : विदर्भात पावसाने घरं पडून लोक मरतायेत, नेते मात्र फोडाफोडीत व्यस्त नागरिकांचा संताप बीजिंग ऑलिम्पिकवेळी झाली होती चर्चा ढगफुटीचा इतिहास (Cloud Bursting History) जरी जुना असला तरी अलीकडच्या काही दशकांत चीनची राजधानी बीजिंगमध्ये ऑलिम्पिक सुरू असताना ही बाब चर्चिली गेली होती. ऑलिम्पिकमध्ये सामना सुरू असताना एकादिवशी हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली. यापासून बचावासाठी चीनने सामन्याच्या एक दिवस आधी कृत्रिम पाऊस पाडला होता. आदल्यादिवशी ढगफुटीची व्यवस्था करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडलाच नव्हता. एका रिपोर्टनुसार, गेल्या 40 वर्षांत देशात ढगफुटीच्या 30 हून अधिक घटना घडल्या आहेत. या सर्व घटना हिमालयाच्या प्रदेशात घडल्या. ढगफुटीनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात अनेक वेळा पूरस्थिती निर्माण झाली आहे. एवढंच नाही तर 2013 मध्ये उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीचं कारण ढगफुटी असल्याचं मानलं जात होतं. तर, आसाममध्येही अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. निरीक्षण केल्यास लक्षात येईल की ढगफुटीच्या बहुतांश घटना भारत-चीनच्या सीमेला लागून असलेल्या भागात घडतात. पण कुठल्याही पुराव्यांअभावी असे आरोप करणं फारसं योग्य नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.