जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Insta वर झाली मैत्री, प्रपोजल नाकारल्याने तरुणीच्या आईवडिलांवर माथेफिरुचा गोळीबार

Insta वर झाली मैत्री, प्रपोजल नाकारल्याने तरुणीच्या आईवडिलांवर माथेफिरुचा गोळीबार

Insta वर झाली मैत्री, प्रपोजल नाकारल्याने तरुणीच्या आईवडिलांवर माथेफिरुचा गोळीबार

इन्स्टाग्रामवर मैत्री (Youth shoots girls parents in one way love affair) झाल्यानंतर तरुणीनं प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यामुळे भडकलेल्या तरुणाने तरुणीच्या आईवडिलांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ग्वालियर, 17 नोव्हेंबर: इन्स्टाग्रामवर मैत्री (Youth shoots girls parents in one way love affair) झाल्यानंतर तरुणीनं प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यामुळे भडकलेल्या तरुणाने तरुणीच्या आईवडिलांवर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या (Friendship on Instagram) तरुणाची इन्स्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर काहीच दिवसात त्यांची मैत्री झाली. या काळात तरुण तरुणीवर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र तरुणीने त्याचा प्रेमसंबंधांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर भडकलेल्या (Firing at girl’s house) तरुणाने तिच्या घरी येऊन गोंधळ घातला. इन्स्टाग्रामवर झाली मैत्री मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणाऱ्या संस्कार परिहार नावाच्या तरुणाशी काही महिन्यांपूर्वी त्याच परिसरातील एका तरुणीशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. ऑनलाईन मैत्री करता करता या तरुणाचं तिच्यावर एकतर्फी प्रेम जडलं. तरुणीला भेटून त्याने प्रेमप्रकरणाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तरुणाने तो प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर तरुण वेगवेगळ्या मार्गाने तिच्याशी संपर्क साधत तिला हा प्रस्ताव स्विकारण्याची मागणी करू लागला. वडिलांनी दिली समज तरुणीने हा प्रकार तिचे वडील राजेश वाधवानी यांना सांगितला. त्यांनी तरुणाला गाठून त्याला समज दिली आणि आपल्या मुलीपासून लांब राहण्याची तंबी दिली. यामुळे चिडलेल्या संस्कारने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री केला हंगामा संस्कार मध्यरात्री वाधवावी यांच्या घरी पोहोचला आणि त्यांच्यावर गोळी झाडली. त्याच्यासोबत त्याचा मित्र समीर खान हादेखील होती. या झटापटीचा आवाज ऐकून राजेश वाधवानी यांची पत्नी मदतीसाठी धावून आली. त्यावेळी तिच्यावरही संस्कारने गोळीबार केला. या गोळीबारात दोघंही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. हे वाचा-  सणकी तरुणाचा आईवडिलांवरच हल्ला, जमिनीच्या वादातून घातल्या गोळ्या पोलीस कारवाई सुरू गोळीबार करून वाधवानी कुटुंबाला जखमी अवस्थेत सोडून घराला बाहेरून कडी लावून संस्कार फरार झाला. ग्वालियरवरून संस्कार आणि त्याचा मित्र समीर हे जयपूरला पळून गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना शोधून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात