आरोग्य विभागाचा मोठा खुलासा, स्थलांतरित मजुरांमुळे 72 टक्कांनी वाढले कोरोनाबाधित रुग्ण

आरोग्य विभागाचा मोठा खुलासा, स्थलांतरित मजुरांमुळे 72 टक्कांनी वाढले कोरोनाबाधित रुग्ण

देशातील विविध राज्याच्या आरोग्य विभागांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,10 जून: देशातील विविध राज्याच्या आरोग्य विभागांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, देशात स्थलांतरित झालेल्या मजुरांमुळे 72 टक्के कोरोनाबाधित रुग्ण वाढली आहेत.

पश्चिमबंगालमध्ये 1 जूनपासून कोरोनाच्या प्रकरणामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. झारखंड, ओडिशा, बिहार नंतर पश्चिम बंगालमध्ये संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ही अशी राज्ये आहेत जेथे स्थलांतरित मजुरांची संख्या मोठी आहे. या राज्यांतील स्थलांतरित मजूर कोरोना प्रकरणात वाढ होण्यास कारणीभूत आहेत, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

हेही वाचा..कोरोना हॉटस्पॉटमध्ये मटण पार्टीवरून महापालिका आणि पोलिस आयुक्तांमध्ये जुंपली

गेल्या 30 मे रोजी केंद्राने अनलॉक 1.0 च्या तीन टप्याची माहिती दिली. अनलॉक 1. 0 ने लॉकडाऊनमध्ये लागू केलेले निर्बंध शिथिल केले आणि 1 जूनपासून आंतरराज्यीय प्रवासासाठी परवानगी दिली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार आतापर्यंत एक कोटी प्रवासी कामगार आपआपल्या राज्यात घरी गेले आहेत.

केंद्राद्वारे चालवल्या जाणार्‍या श्रमिक ट्रेनच्या मदतीने स्थलांतरित मजूर बिहार, ओरिसा आणि झारखंड यासारख्या राज्यात गेले. ही स्थलांतरित मजुरांची आकडेवारी 1 मे ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आहे. स्थलांतरित मजुरांच्या आगमनामुळे कोरोनामधील प्रकरणे या राज्यांत वाढली असली तरी महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूच्या तुलनेत या राज्यांमधील कोरोनाचे प्रमाण कमी आहे.

जूनच्या पहिल्या आठ दिवसांत पश्चिम बंगालमध्ये 3300 नवीन प्रकरणे नोंदली गेली, तर मे च्या पहिल्या आठ दिवसांत ही आकडेवारी1042 होती. झारखंडमध्ये जूनच्या सुरूवातीस 610 घटना घडल्या असून मे मध्ये ती 360 होती. झारखंडमध्ये कोरोनाची 1290 प्रकरणे आहेत. त्याचप्रमाणे, 31मे रोजी ओरिसामध्ये कोरोनाचे 1948 प्रकरणे वाढून 2994 वर पोहोचल्या.

परप्रांतीय कामगारांमुळे कोरोनाची प्रकरणे 72 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. बिहारचे मध्ये 3 ते 5 जून दरम्यान 20 लाख प्रवासी मजूर 1,491 कामगार गाड्यांच्या मदतीने राज्यात दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशमध्ये रुग्ण ठीक होण्याची टक्केवारी प्रमाण 65 टक्के असूनही दररोज कोरोनाचे नवीन प्रकरण कमी होत नाहीत. भोपाळ, इंदूर , जबलपूर अशी मोठी शहरे अजूनही लॉकडाऊनमध्ये आहेत.

झारखंडमध्ये मोठ्या संख्येने चाचणी न केलेले नमुने गोळा करण्यात आले असून त्याचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार होता. त्यामुळे राज्यात आता कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.

ओडिशा सरकारने सांगितले की विलगीकरण केंद्रात राहणाऱ्या 1,557 स्थलांतरित कामगारांच्या 80 टक्के प्रकरणांमध्ये गेल्या 15 दिवसांत नोंद झाली आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आता कोरोना ओरिसाच्या गरीब भागात देखील पाय पसरवित आहे. कोरोना प्रकरणांच्या वेगाबाबत पश्चिम बंगाल सरकारने केंद्र सरकारला कचाट्यात पकडण्याच्या प्रयत्नात आहे.

हेही वाचा....पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार पडली विहिरीत, आईसह दोन चिमुरड्यांचा करुण अंत

गेल्या 25 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची 3816 प्रकरणे होती आणि ती जूनला 8613 पर्यंत वाढली. भारतीय रेल्वे कोणाच्या मालकीची आहे हे सर्वाना माहित आहे. ज्याने मेंढरासारख्या गाड्यांमध्ये स्थलांतरित श्रमिकांना भरून पाठवून दिले आहे.

First published: June 10, 2020, 5:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading