Home /News /national /

मुस्लीम धर्मियांचे स्तुत्य पाऊल, रमजानमध्ये कुराणचे पठण होणार फेसबुक लाईव्ह

मुस्लीम धर्मियांचे स्तुत्य पाऊल, रमजानमध्ये कुराणचे पठण होणार फेसबुक लाईव्ह

देशभरात कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहे. याच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया हा उपक्रम सुरू करीत आहे

    लखनऊ, 23 एप्रिल : देशभरात कोरोना (Covid -19) व्हायरसमुळे 3 मेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या काळात मुस्लीम समुदायाचा पवित्र महिना रमजान (Ramzan) सुरू होत आहे. रमजानमध्ये खुदासाठी इबादत केली जाते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे कोणीही व्यक्ती मशिदीत जाऊन अल्लाची  इबादत करण्यासाठी घराबाहेर पडू शकत नाही. यासाठी सर्व मुस्लीम धर्मगुरुंनी लोकांना अपील केलं आहे की ते घरातच राहून इबादत करावं. यादरम्यान ईदगाहचे इमाम आणि इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी एक नवा प्रयत्न केला आहे. मौलाना यांनी रमजानदरम्यान होणारी कुराणची तिलावत वा त्यांच पठण फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. मौलाना खालिद रशीद यांनी सांगितले की, ‘रमजानच्या 30 दिवसांमध्ये कुराण ऐकणं आवश्यक असतं. सध्या लॉकडाऊनमध्ये मशिदी बंद आहेत त्यामुळे तेथे जाऊन कुराण ऐकणे शक्य नाही. अशावेळी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तास इस्लामिक सेंटर ऑफ इंडिया यांनी फेसबुकच्या माध्यमातून कुराणची तिलावत लाइव्ह करण्यात येईल. रमजानमध्ये याहून अधिक चांगल्या पद्धतीने इबादत करण्याची संधी मिळणार नाही.’ सध्या देशभरात नागरिकांमध्ये कोरोनाची भीती वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. कदाचित त्यापुढेही प्रवासावर आणि घराबाहेर पडण्यावर बऱ्याच अंशी निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सण-उत्सव घरात राहूनच केले जात आहे. अशातच रमजानच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. संबंधित -PPE किट अभावी Corona योद्ध्यांचा जीव धोक्यात, सायनमधील 16 विद्यार्थ्यांना संसर्ग धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि...
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या