Home /News /mumbai /

PPE किट अभावी कोरोना योद्ध्यांचा जीव धोक्यात, सायनमधील 16 परिचारिका प्रशिक्षणार्थींना संसर्ग

PPE किट अभावी कोरोना योद्ध्यांचा जीव धोक्यात, सायनमधील 16 परिचारिका प्रशिक्षणार्थींना संसर्ग

या घटनेनंतर कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे

    मुंबई, 23 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाविरोधात (Coronavirus) लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना कोरोनाची (Covid - 19) लागण झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. वैद्यकीय कर्मचारी रुग्णालयात राहून कोरोनाबाधितांची सेवा करीत आहेत. अनेक दिवस ते घरीही जात नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई-पुण्यातील अनेक परिचारिकांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यातच आज मुंबईतील सायन रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या 16 परिचारिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या सायन रुग्णालयात परिचारिकेचे प्रशिक्षण घेत असलेल्या 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विद्यार्थिनींना सेव्हन हिल्स रुग्णालयात पालिकेने कामासाठी पाठविले होते. यावेळी विद्यार्थिनी कोरोना रुग्णांची सेवा करीत होते. मात्र कामादरम्यान त्यांना सुरक्षिततेचा अभाव असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांचे मृतदेह हाताळताना त्यांना पीपीई किट दिले जात नाही, असा आरोप या विद्यार्थिनींनी केला आहे.  या विद्यार्थिनींकडून कामाला नाही म्हणत असले तरी त्यांच्यावर कामाची सक्ती केली जात असल्याची बाब त्यांनी सांगितली. या प्रशिक्षणार्थी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आल्यानंतर तब्बल 68 विद्यार्थिनींना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 15 एप्रिल रोजी राज्यातील मृत्यूदर 6.61 टक्क्यांच्या घरात होता. देशाच्या मृत्यूदराच्या तुलनेत हा दर जवळपास 3.32  टक्क्यांनी जास्त होता.  22 एप्रिल रोजी सकाळी 10 पर्यंत राज्यातील संसर्गग्रस्तांचा आकडा 5 हजार 229 च्या घरात पोहचला, तर आतापर्यंत 251 रूग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांमध्ये राज्यातील विविध शहरांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला. संबंधित -धक्कादायक! अंत्यसंस्कारानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि... मालेगावमध्ये धक्कादायक प्रकार, लॉकडाऊनमुळे जमावाने पोलिसांवर घेतली धाव
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india, Sion hospital

    पुढील बातम्या