एक थोबाडीत खाताच मसूद अझहरनं दिली होती दहशतवादी कारवायांची माहिती

एक थोबाडीत खाताच मसूद अझहरनं दिली होती दहशतवादी कारवायांची माहिती

भारतीय लष्कर अधिकाऱ्यानं मसूद अझहरच्या एकच सणसणती थोबाडीत लगावली आणि...

  • Share this:

नवी दिल्ली,01 मे : लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भारताच्या राजनैतिक रणनीतीचा मोठा विजय झाल्याचं मानलं जात आहे. फ्रान्सनं हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला चीनने विरोध केला होता. पण त्यानंतर चीनने हा विरोध कमी केला. अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवण्याच्या निर्णयाला 151 देशांनी पाठिंबा दिला आहे.

जगभरात झालेल्या काही भीषण दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार आणि 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा कर्करोगाने मृत्यू झाल्याची माहिती गुप्तहेर खात्यातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली होती. शनिवारी(2 मार्च)इस्लामाबादमधील आर्मी हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. यापार्श्वभूमीवर, 1994मधील मसूदसंदर्भातील एक घटनादेखील चर्चेत आली होती.

1994 ला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हरकत-उल-मुजाहिद्दीनचा सदस्य असल्याच्या कारणावरुन अजहर मसूदला अटक झाली होती. याप्रकरणात मसूदची चौकशी करणाऱ्या एका माजी अधिकाऱ्यानं या घटनेबाबतची माहिती दिली.

हेही वाचा: भारताला मोठे यश, मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत

कुख्यात दहशतवादी मसूद अझहरची चौकशी करणं भारतीय लष्करासाठी अगदी सोपं होतं, असं म्हटलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याने मसूद अझहरला केवळ एकच सणसणीत थोबाडीत लगावली आणि त्यानं घाबरून दहशतवादाबाबतची संपूर्ण माहिती सांगायला सुरुवात केली होती.

पोर्तुगालच्या पासपोर्टवर अझहरनं बांगलादेश मार्गे भारतात घुसखोरी केली होती आणि तेथून मग तो काश्मीरमध्ये पोहोचला होता. यानंतर दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये फेब्रुवारी 1994मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

मसूद अझहर अटकेत असताना त्याच्या चौकशीसाठी गुप्तचर यंत्रणांना जास्त मेहनत घ्यावी लागली नव्हती. भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्यानं एकच थोबाडीत लगावतचा त्यानं पाकिस्तानात सक्रीय असणाऱ्या दहशतवादी गटांबाबतची तपशीलवार माहिती देण्यास सुरुवात केली होती.

सिक्किमचे माजी पोलीस महानिरीक्षक अविनाम मोहनाने यांनीही सांगितलं होतं की, 'मसूद अझहरची चौकशी करणं अगदी सोपं काम होतं. एका भारतीय सेना अधिकाऱ्यानं मारलेल्या एका थोबाडीतच तो वाईटरित्या घाबरला होता'.

पुढे त्यांनी असंही सांगितलं होतं की, अटकेत असताना मसूदनं पाकिस्तानातील दहशवाद्यांची भरती प्रक्रिया आणि दहशतवादी संघटनांच्या कामाबाबतची माहिती दिली होती.

SPECIAL REPORT : कोण आहे आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर!

First published: March 3, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading