मराठी बातम्या /बातम्या /देश /Marathi Language Elite Status : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मार्ग मोकळा, 27 तारखेला घोषणेची शक्यता

Marathi Language Elite Status : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या मार्ग मोकळा, 27 तारखेला घोषणेची शक्यता

जर केंद्र सरकार सकारात्मकपणे ही मागणी मान्य करण्यासाठी तयार आहे तर येत्या 27 फेब्रुवारीला ही घोषणा करावी

जर केंद्र सरकार सकारात्मकपणे ही मागणी मान्य करण्यासाठी तयार आहे तर येत्या 27 फेब्रुवारीला ही घोषणा करावी

जर केंद्र सरकार सकारात्मकपणे ही मागणी मान्य करण्यासाठी तयार आहे तर येत्या 27 फेब्रुवारीला ही घोषणा करावी

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Language Elite Status) दर्जा मिळावा,यासाठी राज्य सरकार युद्धस्तरावरती प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची तत्वतः मान्य केले आहे, असा दावा राज्याचे उद्योग व सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई (subhash desai) यांनी केला आहे. मात्र श्रेयवादाच्या लढाईत ही मागणी 27 फेब्रुवारी रोजी पूर्ण होते की नाही हे पहावे लागणार आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यातील खासदार अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेत मागणी करीत असतात. मात्र या मागणीकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यसभेत सवाल उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना केंद्रीय संसदीय कामकाज व सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन मेगवाल यांनी दावा केला होता की, 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आंतर मंत्रालयीन स्तरावर ती सकारात्मक चर्चा सुरू आहे'.

('हाय जानू कुठायसं तू....मी बा बोलतोय तिचा'; स्वप्नील जोशीचं भन्नाट रील्स Viral)

त्यानंतर आज राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी यांची भेट घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी केली. यावेळी किसन रेड्डी यांनी 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या मागणीला होकार दर्शविला आहे', असा दावा देसाई यांनी केला.

(जोडप्यांना सेक्स दरम्यान असते परफॉर्मन्सची चिंता! या 6 मार्गांनी होतील आनंददायी)

जर केंद्र सरकार सकारात्मकपणे ही मागणी मान्य करण्यासाठी तयार आहे तर येत्या 27 फेब्रुवारीला ही घोषणा करावी अशी मागणी देखील सुभाष देसाई यांनी केली. राज्य सरकारच्या वतीने सर्व ते पुरावे केंद्रीय मंत्रालयाला पुरवण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

किती भाषांना आहे अभिजात दर्जा

यापूर्वी देशात आतापर्यंत तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्यालम आणि उडिया भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.अ भिजात भाषांचे निकष एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा 1500 ते 2000 वर्षाचा नोंदणीकृत इतिहास असायला हवा, सोबतच या भाषेतील साहित्याचे ऐतिहासिक पुरावे असावे लागतात. सोबत त्या भाषेत मूळ साहित्यिक परंपरा असावी लागते तसेच इतर भाषांमधून आलेले नसावे अशा अनेक अटी असतात. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्या भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने पाचशे कोटी पेक्षा जास्त निधी दिला जातो. यामध्ये त्या भाषेच्या विकासासाठी विविध प्रकारच्या योजना आणि कार्यक्रम आखले जातात सोबतच या भाषेत श्रेष्ठतम साहित्य निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते.

First published:
top videos