मुंबई, 21 फेब्रुवारी- अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. त्याच्या मुलांसोबतचे फनी व्हिडिओ तसेच त्याच्या कामाबद्दल अपडेस देखील तो शेअर करत असतो. त्याचे भन्नाट रील्समुळे देखील तो चर्चेत असतो. नुकतच स्वप्नीलने एकदम गावरान स्टाईल एक कडक इन्स्टा (swapnil joshi trending reels) रील्स शेअर केले आहे. हे रील्स पाहून तुम्ही देखील हसून लोटपोट व्हाल एवढी मात्र नक्की आहे. स्वप्नीलने त्याच्या इन्स्टावर एक रील्स शेअर केले आहे. एका व्हाय फोन कॉलवरून हे रील बनवण्यास आलं आहे. य़ात स्वप्निल फोनवर म्हणताना दिसत आहे की, : ‘हाय जानू कुठायसं तू जेवलीस काय, काय करत हायस….मी बा बोलतोय तिचा कोण रं तू ..? यावर स्वप्नीलची बोलतीच बंद होते. मग काय स्वप्निल म्हणतो की, इस डायलर ट्यून को कॉफी करने केलिए स्टार दबाऐ….धन्यवाद….जी स्वप्नीलची अवस्था झालेय तशी फोन गर्लफ्रेंडला लावल्यानंतर तिच्या वडिलांनी फोन उचलल्यानंतर अनेक मुलांची अवस्था होत असणार. सध्या हे रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय या रील्सवर चाहत्यांकडून देखील कमेंटचा वर्षाव होत आहे.
स्वप्नील जोशी बऱ्याच वर्षांनी एका मालिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्यासोबतची जोडीही खूप खास आहे. ‘तू तेव्हा तशी’ मालिकेत स्वप्नील आणि अभिनेत्री शिल्पा तुळस्कर एक फ्रेश जोडी म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. स्वप्नील आणि शिल्पाची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येत आहे. त्यामुळे चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहात आहेत. तू तेव्हा तशी ही मालिका 30 मार्चपासून झी मराठीवर सुरू होत आहे. वाचा- मनोज वाजपेयीच्या ‘फॅमिली मॅन’ विषयी समोर आली मोठी अपडेट स्वप्नील जोशी चार वर्षानंतर छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘जीवलगा’ ही त्याची शेवटची मालिका होती. स्वप्नील सध्या ‘चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोचा एक भाग आहे. तो या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. तर दुसरीकडे, शिल्पा तुळस्करही शेवटची ‘तुला पाहते रे’ मध्ये सुबोध भावेसोबत दिसली होती.