मराठी बातम्या /बातम्या /देश /पतीच्या सुटकेसाठी सात दिवस जंगलात भटकली, अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला

पतीच्या सुटकेसाठी सात दिवस जंगलात भटकली, अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला

अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला, पतीच्या सुटकेनंतर महिला ढसाढसा रडली

अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला, पतीच्या सुटकेनंतर महिला ढसाढसा रडली

अभियंत्याची सुटका व्हावी यासाठी त्याची पत्नी गेल्या सात दिवसांपासून जंगलात वणवण भटकत होती. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. नवऱ्याची सुरक्षित सुटका झाल्याचे पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

रायपूर, 17 नोव्हेंबर : नक्षलग्रस्त भागात (Naxal-affected areas) प्रशासनातील अधिकारी, पोलीस (Police) आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले केल्या जाण्याच्या घटना आपण नेहमी बघितल्या आहेत. एप्रिल महिन्यात छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 21 जवान शहीद झाल्याची घटना समोर आली होती. या अशा घटना वारंवार समोर येतात. नुकतंच छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याचं अपहरण (Kidnapping of an engineer) केलं होतं. या अभियंत्याच्या पत्नीने केलेल्या पायपीटमुळे अखेर माओवाद्यांना माणुसकीचा पाझर फुटला. त्यांनी अखेर सात दिवसांनी त्या अभियंत्याची सुटका केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

छत्तीसगडमध्ये सात दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या अभियंत्याचे माओवाद्यांनी हजारो नागरिकांची जनअदालत लावून सुटका केली. विशेष म्हणजे अभियंत्याची सुटका व्हावी यासाठी त्याची पत्नी गेल्या सात दिवसांपासून जंगलात वणवण भटकत होती. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आलं. नवऱ्याची सुरक्षित सुटका झाल्याचे पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला.

हेही वाचा : मालेगाव-अमरावती हिंसाचारावर शरद पवार बोलले, सरकारला दिला महत्त्वाचा सल्ला

गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील अजय लकडा या बांधकाम विभागाच्या अभियंत्याचे माओवाद्यांनी अपहरण केले होते. या अपहरणानंतर पतीची सुटका करावी, अशी विणवणी करत पत्नी जंगलात माध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन गेल्या सहा दिवसांपासून वणवण भटकत होती. काही सामाजिक संघटनानींही महिलेच्या पतीच्या सुटकेबाबत माओवाद्यांना आवाहन केले होते.

अखेर माओवाद्यांनी अभियंत्याला सोडलं

अखेर आज छत्तीसगडच्या घनदाट जंगलात माओवाद्यांनी हजारो नागरिकांना बोलावून जनअदालत घेतलं. तिथे रस्ते-पुलांच्या बांधकामाला विरोध दर्शवून या अभियंत्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. यावेळी पतीच्या सुटकेसाठी जंगलात वणवण भटकणाऱ्या पत्नीच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला. तिने तिथेच नवऱ्याची गळाभेट घेतली.

हेही वाचा : राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, बॅरिकेड्स तोडत आतमध्ये घुसली कार

महिलेचं सर्वत्र कौतुक

विशेष म्हणजे जंगलातील वेगवेगळे हिंस्त्रक जनावरं आणि माओवादी यांना न भीता, जीवाची परवा न करता अभियंत्याची पत्नी आपल्या पतीचा शोध घेत होती. तिच्या डोळ्यांमधील अश्रूंची अखेर माओवाद्यांना देखील दखल घ्यावी लागली. पतीला भेटल्यानंतर तिने त्याला कडकडून मिठी मारली. तसेच "आपण याआधी अनेक संकटं पाहिले. हे देखील एक भयानक संकट होते. यापुढे देखील सर्वच संकटांमध्ये मी तुझी अशीच साथ देईन", असं महिला आपल्या पतीला म्हणला. या महिलेचं आता सर्वत्र कौतुक होत आहे.

First published:
top videos