नागपूर, 17 नोव्हेंबर : त्रिपुरातील (tripura violence ) कथित हिंसाचार प्रकरणावरून मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये (amravati violence) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले आहे. या घटनेवरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. या घटनेवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी प्रतिक्रिया देत ज्या लोकांचे नुकसान झाले आहे, त्यांची भरपाई देण्याबाबत राज्य सरकारला सल्ला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. आज नागपूरमध्ये नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित संवाद मेळाव्यात व्यापारी व उद्योजक यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी राज्यात घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांवर पहिल्यांदाच त्यांनी भाष्य केलं. ‘त्रिपुराची घटना घडली, ती घटना घडली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. पण या मुद्यावरून राज्यातील काही शहरात हिंसाचार घडवून आणला गेला, पोलिसांनी तो नियंत्रित आणला. मात्र अशा घटनेत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. जातीय धार्मिक हिंसाचारात व्यापाऱ्यांच्या दुकानांचे नुकसान होते तर त्यांना कशी मदत व नुकसानभरपाई दिली जाईल यावर नवीन धोरण तयार करण्याची गरज आहे, राज्य सरकारने यावर विचार करावा, असा सल्ला पवारांनी राज्य सरकारला दिला. IND vs NZ 1st T20 : पाऊस खेळ खराब करणार? पाहा जयपूरचा Weather Report ‘जेव्हा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळते त्याचे कर्तव्य असते आपल्या भागातील विकासाला लक्ष देणे गरजेचे असते. मागची पाच वर्ष विदर्भातील नेतृत्वाकडे राज्याची सत्ता होती. त्यामुळे त्यांचे कर्तव्य होते की स्थानिक समस्या सोडवावी’ असा टोलाही पवारांनी फडणवीसांना लगावला. ‘नितीन गडकरी यांच्याकडे कोणताही आमदार असो वा खासदार असो, आपल्या समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीचा पक्ष न बघता ते काम करतात, असं म्हणत शरद पवारांनी नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. पोत्यात बांधलेल्या अवस्थेत नदीत आढळला मृतदेह, खळबळजनक घटनेनं कराड हादरलं! तसंच, देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेती, व्यापार व उद्योगाचे महत्व आहे. कृषी, व्यापार व उद्योग मजबुतीत देशात महाराष्ट्राचे नाव आहे मात्र महाराष्ट्र राज्यात प्रादेशिक असमतोलता आहे. हा प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी राज्य चालवणाऱ्या लोकांनी लक्ष द्यावे, असंही पवार म्हणाले. राज्यात प्रदेशनिहाय्य, विभाग निहाय्य व्यापारी व उद्योजकांच्या संघटना आहे, त्या सर्व संघटना एकत्र आल्या तर अनेक समस्यांचा सामना करायला व्यापाऱ्यांना उद्योजकांनाच मदत होईल, असंही पवार म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.