मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING : छत्तीसगड चकमकीत 24 जवान शहीद, माओवाद्यांनी शस्त्रसाठ्याचे PHOTOS केले प्रसिद्ध

BREAKING : छत्तीसगड चकमकीत 24 जवान शहीद, माओवाद्यांनी शस्त्रसाठ्याचे PHOTOS केले प्रसिद्ध

जवानांचा शस्त्रसाठा, त्यांचे मोबाईल आणि काही पैसे असं सुद्धा या फोटोत दिसून येत आहे.

जवानांचा शस्त्रसाठा, त्यांचे मोबाईल आणि काही पैसे असं सुद्धा या फोटोत दिसून येत आहे.

जवानांचा शस्त्रसाठा, त्यांचे मोबाईल आणि काही पैसे असं सुद्धा या फोटोत दिसून येत आहे.

छत्तीसगड, 06 एप्रिल : छत्तीसगडमधील  (Chhattisgarh) नक्षलग्रस्त बीजापुर-सुकमा (Bijapur- Sukma Border) जिल्ह्याच्या सीमेवर शनिवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये (maoist attack in Chhattisgarh) चकमक झाली होती. या चकमकीत 22 जवान शहीद झाले. पण आता माओवाद्यांनी या चकमकीत 24 जवान ठार झाल्याचा दावा केला आहे. तसंच अपहरण केलेले जवान आपल्या ताब्यात असल्याचा दावाही माओवाद्यांनी केला आहे.

बिजापुर चकमकीवर माओवाद्यांनी मोठा खुलासा केला आहे. माओवाद्यांनी याबद्दल एक पत्रक आणि काही फोटो प्रसिद्ध केले आहे. जवानांसोबत झालेल्या चकमकीत 24 जवान ठार झाल्याचा दावा केला आहे. तर या चकमकीत 4  माओवादी ठार झाल्याचा दावा केला असून मृतक माओवाद्यांचे फोटोही जारी केले आहे.

एवढंच नाहीतर माओवाद्यांनी चकमकीनंतर सुरक्षा दलांची शस्त्रे लुटून नेली होती. त्या शस्त्रसाठ्याचा फोटोही माओवाद्यांनी जाहीर केला आहे. जवानांचा शस्त्रसाठा, त्यांचे मोबाईल आणि काही पैसे असं सुद्धा या फोटोत दिसून येत आहे.

अपहरण केलेला जवान सुरक्षितपणे ताब्यात असल्याचे सांगत लवकरच सुटका करणार असल्याचे माओवाद्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी 150 नागरिकांना ठार मारल्याचा माओवाद्यांनी दावा केला आहे.  माओवाद्यांचा दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता विकल्पने हे पत्रक जारी केले आहे.

...म्हणून सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव यांच्या मागणीनंतर केंद्राचं उत्तर

दरम्यान, 5 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Home Minister Amit Shah) यांनी प्रथमच छत्तीसगडचा दौरा केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी सांगितले की, 'नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना सरकार आणि देशातली सर्व नागरिकांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. आज आम्ही या प्रकरणावर बैठक केली आहे. मी देशावासियांना आश्वासन देतो की, ही लढाई थांबणार नाही उलट आणखी तीव्र होईल. नक्षलवाद्यांच्या विरोधातील लढाईत अखेर आपला विजय निश्चित आहे.'

corona संचारबंदीचं उल्लंघन पडलं महागात; पोलिसांच्या शिक्षेने तरुणाचा मृत्यू

'गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवादाच्या विरोधातील लढाई निर्णायक वळणावर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे ही लढाई आणखी दोन पाऊल पुढे सरकली आहे. मी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत या विषयावर चर्चा केली आहे. आमच्या जवानांचं मनोधैर्य कायम आहे.' असंही अमित शहा म्हणाले.

First published:

Tags: Amit Shah, Attack, Chhattisgarh