Home /News /lifestyle /

...म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर मोदी सरकारने दिलं उत्तर

...म्हणून आम्ही सर्वांना कोरोना लस देत नाही; उद्धव ठाकरेंच्या मागणीनंतर मोदी सरकारने दिलं उत्तर

25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे केली होती.

    नवी दिल्ली, 06 एप्रिल : देशात सध्या 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस (Corona vaccine) दिली जाते आहे. पण आता त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाही कोरोना लस (Covid 19 vaccine) द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारकडे ही मागणी केली जात आहे. केंद्र सरकार सरसकट सर्वांना किंवा प्रत्येक व्यक्तीला कोरोना लस का देत नाही आहे, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. अखेर केंद्र सरकारने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. सर्वांचं कोरोना लसीकरण करावं, यासाठी का परवानगी दिली जात नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितलं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याचं कारण दिलं आहे. राजेश भूषण यांनी सांगितलं, "अनेक जण आम्हाला विचारत आहेत ही सर्वांना लसीकरण का केलं जात नाही आहे. याचं कारण म्हणजे या लसीकरण मोहिमेची दोन उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूला रोखणं आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेवा प्रणालीची सुरक्षा. याचा उद्देश असा की ज्यांना कोरोना लस हवी आहे, त्यांंना नाही तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लस देणं आहे" हे वाचा - '...तर 2-4 आठवड्यांतच कोरोना केसेस कमी होतील', कोव्हिड टास्क फोर्सने दिला मंत्र सर्वांना कोरोना लस द्यावी यासाठी अनेक नेत्यांनी पंतप्रधान मोदींकडे मागणी केली आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना पत्र लिहिलं. केजरीवाल यांनी सर्वांना कोरोना लस द्यावी अशी मागणी केली. तर उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली. हे वाचा - कतरिना कैफही कोरोना पॉझिटिव्ह; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम शिवाय सोमवारी 24 तासांत कोरोना लशीचे 43 लाख डोस देण्यात आले, हा एक विक्रम असल्याचं सांगितलं. यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत देशात एकूण 8.31 कोटी डोस देणअयात आले. अमेरिकेत कोरोना लसीकरणाचा दैनंदिन सरासरी दर 30.53 लाख डोस आहे तर भारतात दिवसाला 26.53 लाख डोस दिले जात आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine in market, Coronavirus, Covid-19

    पुढील बातम्या