Home /News /national /

तापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश

तापमान वाढीमुळे जाणार अनेकांचे बळी; 2041 साली या शहरातील तापमान होईल 50 अंश

मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं.

मे महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी इथलं तापमान 51 डिग्री सेल्सियस नोदवलं गेलं होतं.

रिपोर्टनुसार 2041 पर्यंत भारतात (India) जीवघेणा उन्हाळा असेल. 2041 मध्ये दिल्लीतील (Delhi) तापमान 49.3 अंशांपर्यंत तर चेन्नई (chennai) शहरात लू म्हणजे उन्हाळी उष्ण वाऱ्यांमुळे अंदाजे 17 हजार 642 जणांना प्राण गमवावा लागेल

नवी दिल्ली 03 जुलै : गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणशास्रज्ञ, पर्यावरणवादी सगळेच जगाला जागतिक तापमान (Temperature) वाढीच्या विपरित परिणामांबद्दल सांगत आहेत. त्यासाठी जागतिक स्तरावर परिषदाही झाल्या. पण अनेक देशांनी या परिषदांत सहभाग घेऊन वचनं दिली आणि नंतर ती पाळली नाहीत. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न केले नाहीत. पण आता ही तापमानवाढ अगदी आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात मान्सून (Monsoon) देशभर पोहोचलेला असतो पण यावर्षी देशाची राजधानी दिल्लीमध्ये अजूनही उन्हाळाच (Hottest Summer) आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील तापमानाने 90 वर्षांतला विक्रम मोडीत काढला. याच परिस्थितीत युरोपातील माध्यम समूह द इकॉनॉमिस्टने तयार केलेल्या एका रिपोर्टमधील (Report) निरीक्षणं लक्ष देण्याजोगी आहेत. या रिपोर्टनुसार 2041 पर्यंत भारतात (India) जीवघेणा उन्हाळा असेल. 2041 मध्ये दिल्लीतील (Delhi) तापमान 49.3 अंशांपर्यंत तर चेन्नई (Chennai) शहरात लू म्हणजे उन्हाळी उष्ण वाऱ्यांमुळे अंदाजे 17 हजार 642 जणांना प्राण गमवावा लागेल. याचाच अर्थ असा की चेन्नईचं तापमानही प्रचंड वाढेल. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानं मृत्यूचा धोका नाही?, केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती द इकॉनॉमिस्टच्यावतीने दरवर्षी तापमानाशी संबंधित रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो. वर्षभरात पृथ्वीवर झालेल्या बदलांचा अभ्यास करून भविष्यातील तापमानाचा अंदाज या रिपोर्टमध्ये मांडला जातो. त्याचबरोबर ऐतिहासिक संदर्भ, वर्तमानकाळातील अंदाज आणि विज्ञानाधारित गोष्टींचाही विचार हा रिपोर्ट तयार करताना केला जातो. या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की 2041 पर्यंत दक्षिण भारतात सर्वाधिक उष्ण तापमान असेल. या उष्णतेचा सर्वांत मोठा परिणाम चेन्नई शहरात जाणवेल असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. द इकॉनॉमिस्टच्या या रिपोर्टमधील निरीक्षणांनुसार चेन्नईत कडक उन्हाळ्यामुळे इतकी लू म्हणजे गरम हवा सुटेल की त्यामुळे लोक आजारी पडतील आणि हॉस्पिटलमधील खाटा कमी पडायला लागतील. चेन्नईच्या हवामानातील आर्द्रता हा घटक तापदायक ठरणार आहे. ओक रिज नॅशनल लॅबरोटरी टेनेसीचे फिजिसिस्ट मोतसिम अशफाक म्हणाले, ‘ 32 अंशांचा वेट बल्ब तापमान एखाद्या माणसाच्या शरीरासाठी धोकादायक असू शकतं. 35 अंश वेट बल्ब तापमानात जिवंत राहू शकतील अशा खूप कमी व्यक्ती असतात. चेन्नईत गेल्या 10 वर्षांत वेट बल्ब तापमान 32 अंशांहून अधिक आहे.’ CBSE Result : बारावीच्या परीक्षेबाबत मोठा निर्णय; 'हे' विद्यार्थी होणार नापास 2015 मध्ये उष्माघाताने 585 जणांचा झाला होता मृत्यू हैदराबादचं तापमान गेल्या 26 वर्षांपासून सातत्याने वाढत आहे. उष्णता वेगाने वाढत असताना ही तापमान वाढ रोखण्यासाठीही जोरात प्रयत्न सुरू आहेत. 2015 या वर्षात हैदराबाद शहर आणि परिसरात उष्णता, लू आणि उष्माघाताने सुमारे 585 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इथल्या सरकारने वाढतं तापमान कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. सगळ्यांनीच मिळून जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच भविष्यात माणूस पृथ्वीवर चांगला जगू शकेल.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Summer, Summer hot, Weather warnings

पुढील बातम्या