• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, केंद्र सरकारची माहिती

कोरोनाच्या दोन्ही डोसमुळे मृत्यूचा धोका 98 टक्क्यांपर्यंत कमी, केंद्र सरकारची माहिती

Corona Vaccination: कोरोना लसीकरणामुळे मृत्यूचा धोका किती टक्क्यांपर्यंत कमी होतो?, स्वतः केंद्र सरकारनं याबाबत माहिती दिली.

 • Share this:
  नवी दिल्ली, 03 जुलै: सध्या देश कोरोना व्हायरस (Corona Virus) सारख्या महामारीचा सामना करत आहे. देशातील दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Variant) आणि तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशात केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) मोहिम राबवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाची मोहिम जागतिक स्तरावर चालवली जात आहे. सध्या भारतात दररोज सुमारे 50 लाख नागरिकांना लस दिली जात आहे. मात्र कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही अनेक शंका आहेत, ज्यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे. या लसीच्या दोन्ही डोसमुळे या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 98 टक्क्यांनी कमी होते, असे केंद्र सांगते. भारतात सध्या सध्या कोविशिल्ड, कोवॅक्सीन यासोबत स्पुतनिक ही रशियन लस लोकांना दिली जात आहे. दरम्यान सध्याच्य परिस्थितीत देशात स्पुतनिकची उपलब्धता कोवाशिल्ड, कोवॅक्सिनपेक्षा थोडी कमी आहे. तज्ज्ञांनी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन डोसची शिफारस केली आहे. तर स्पुतनिकला एकच डोस लस असं सांगण्यात आलं आहे. हेही वाचा- यामी गौतमनंतर बॉलिवूडचा आणखी एक अभिनेता EDच्या जाळ्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात इतरही अनेक लस स्थापित केल्या जात आहेत, ज्यांच्या दोन डोसची तज्ज्ञांनी शिफारस केली आहे. यावर केलेल्या अभ्यासाच्या आधारे सरकारने असं म्हटले आहे की, लसीच्या दोन्ही डोसमुळे कोविड -19 मुळे होणाऱ्या मृत्यूची शक्यता कमी होते. दोन्ही लसीच्या डोसमुळे मृत्यूची शक्यता 98 टक्क्यांनी कमी होते तर एका डोसमधून सुमारे 92 टक्के बचाव होतो.
  Published by:Pooja Vichare
  First published: