नवी दिल्ली 03 जुलै : गेल्या दीड वर्षापासून देशात पसरलेल्या कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) शाळा, कॉलेजेस प्रत्यक्षात नाहीत तर व्हर्च्युअल म्हणजेच ऑनलाइन (online) पद्धतीनं चालली. शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑनलाइन घेण्यात आल्या. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळं निकाल कसा लावायचा आणि त्यावर आधारीत पुढील प्रवेश प्रकिया कशी राबवावी असा प्रश्न शिक्षण मंडळासमोर होता. त्यावर अंतर्गत मूल्यमापन करून निकाल लावण्याचा निर्णय आयसीएसई (ICSE), सीबीएसई (CBSE) आणि राज्यातील एसएससी (SSC) बोर्डानं घेतला. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीचे, अकरावीचे आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षांचे गुण धरून अंतिम गुण देण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी या गुणांवर समाधानी नसतील त्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. मात्र परीक्षा होणार नसल्यानं आणि आपोआप आपण या परीक्षेत उतीर्ण होणार या आनंदात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय उच्च माध्यमिक मंडळ अर्थात सीबीएसईनं (CBSE) एक धक्कादायक बातमी दिली आहे. मुंबईजवळच्या ‘या’ जिल्ह्यातही बोगस लसीकरण, बनावट प्रमाणपत्राचंही वाटप जे विद्यार्थी ऑनलाइन वर्ग किंवा प्री बोर्ड आणि सहामाही परीक्षेला गैरहजर होते, त्यांना प्रमोट (Promote) न करण्याचा निर्णय सीबीएसईनं घेतला आहे. जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात शिक्षण घेत नाहीत किंवा प्री बोर्ड किंवा अर्धवार्षिक परीक्षेला अनुपस्थित होते, त्यांना गैरहजर (Absent) गृहीत धरले जाईल. त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही, असं सीबीएसईनं जारी केलेल्या परिपत्रकात (Notification) स्पष्ट केलं आहे. त्यामुळं परीक्षा न देताही यंदा उत्तीर्ण होणार असं गृहीत धरून वर्षभर अभ्यासाबाबत निष्काळजीपणा करणार्या विद्यार्थ्यांनां मोठा धक्का बसला आहे. सीबीएसईनं सर्व शाळांना हे परिपत्रक पाठवलं असून, जे विद्यार्थी वर्षभर शाळेच्या संपर्कात नव्हते, ज्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही आणि ऑनलाइन वर्गातही भाग घेतला नाहीत, त्यांना गैरहजर मानले जाईल. अशा गैरहजर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार नाही याची शाळांनी दक्षता घ्यावी. अशा विद्यार्थ्यांना शून्य गुण द्यावेत, असं त्यात स्पष्ट नमूद केलं आहे. अखेर करा तुमचा Dream Job! भारतातील ही कंपनी देतेय 9 तास झोपण्याचे 10 लाख दरम्यान, सीबीएसईनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शाळांना 12वीचे मार्क अपलोड करण्यासाठी सीबीएसईनं आपल्या पोर्टलवर लिंक अॅक्टीव्ह केली आहे. 5 जुलैपर्यंत शाळांना थिअरीचे मार्क अपलोड करावे लागतील. तर अकरावीचे मार्क अपलोड करण्याची शेवटची तारीख 2 जुलै होती. सीबीएसईचा 12 वीचा निकाल 31 जुलै किंवा त्यापूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सीबीएसईच्या दहावीचं टॅब्युलेशन पूर्ण झालं असून, दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.