नवी दिल्ली, 10 मार्च: पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल (Assembly Election Results 2022 Live updates) आज देशाचं लक्ष वेधून घेत आहेत. या पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यातलं सर्वात छोटं राज्य खरं तर गोवा, पण 60 विधानसभा जागा असलेल मणिपूर (Manipur Assembly election result 2022) हे राज्य त्यातल्या त्यात सर्वात दुर्लक्षित. या राज्यात सत्ता स्थापन करून भाजपने गेल्या वेळी इतिहास घडवला होता. आता ते यश किंवा त्याच करामती याहीवेळी पक्ष साधू शकेल का हे आजच्या निकालात स्पष्ट होईल.
सोमवारी EXIT POLLS चे निकाल जाहीर झाले. त्यानुसार पाच पैकी चार राज्यांत सध्या भाजपची सत्ता आहे. त्यापैकी उत्तर प्रदेश सोडता इतर राज्यांमध्ये सत्ता टिकवून ठेवणं भाजपला जड जाऊ शकतं, असं हे निवडणूक निकालाचे अंदाज सांगतात. Seven sisters पैकी एक असलेल्या मणिपूरमध्ये 2017 मध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता खेचून आणली होती. छोट्या स्थानिक पक्षांशी युती करत भाजप सत्तेवर आले, पण आता वेगवेगळं लढताना भाजपच्या पदरात चांगल्या जागा मिळू शकतीस, असा अंदाज आहे. असं असंल तरी स्वबळावर सत्ता खेचून आणणं मणिपूरमध्ये भाजपला जड जाणार आहे.
मणिपूरमध्ये 60 विधानसभा जागांपैकी 31 जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे. या वेळी कुठलाच एक पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही असा बहुतेक exit polls चा अंदाज आहे.सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप बहुतमाच्या आकड्याच्या जवळ पोहोचू शकतो, असंही काही सर्व्हे सांगतात.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने 21 जागा जिंकून एनपीपी आणि नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) आदींसह अनेक पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं होतं. मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याची ती पहिलीच वेळ होती. या वेळी मात्र चित्र वेगळं आहे. या तिन्ही पक्षांनी या वेळी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असून, एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले होते. तत्पूर्वी 2017 पर्यंत मणिपुरात सलग 15 वर्षं काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसने चार डावे पक्ष आणि जनता दल (सेक्युलर) या पक्षांसोबत युती करून यंदा निवडणूक लढवली आहे.
मणिपुरात दोन टप्प्यांत मतदान झालं असून, 10 मार्चला निकाल आहे. गेल्या वेळी भाजपने काँग्रेस आमदारांना आपल्या बाजूला वळवलं होतं. या वेळी या दोन्ही पक्षांची परस्परांच्या नेत्यांवर नजर आहे. त्यामुळे नेमकं काय होतं, ते लवकरच कळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assembly Election, BJP, Manipur, काँग्रेस