अहमदाबाद, 31 ऑगस्ट : काळ्या चिमणीची राख (Superstition) तिच्यावर टाकली की ती पटणार, एका फिल्ममधील हा सीन तुम्हाला चांगलाच माहिती असेल. असाच काहीसा प्रयत्न एका तरुणाने प्रत्यक्षात करून पाहिला जो त्याला चांगलाच महागात पडला. असाच मार्ग निवडत गर्लफ्रेंडला परत मिळवण्याच्या नादात तरुणाला तब्बल 43 लाखांचा फटका बसला आहे (Man seek bhondubaba help for get back girlfriend). गर्लफ्रेंड (Girlfriend) बोलत नसेल, रुसून गेली असेल तर तिला मनवण्यासाठी किंवा तिला परत मिळवण्यासाठी तरुण (Boyfriend) काय काय नाही करत आणि मग त्यांचे किती तरी प्रयत्न त्यांच्यावरच उलटून भारी पडतात. असंच हे गुजरातमधील प्रकरण आहे. मूल होत नाही, लग्न होत नाही, नोकरी मिळत नाही, बिझनेसमध्ये यश मिळत नाही… अशा बऱ्याच तक्रारी घेऊन किती तरी लोक आजही भोंदूबाबाकडे जातात. पण अहमदबादमधील तरुण तर चक्क आपल्या गर्लफ्रेंडसाठीही भोंदूबाबाकडे गेला. गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात करण्याचा तांत्रिकाचा मंत्र या तरुणाला चांगलाच महागात पडला. हे वाचा - मी की मुलं, प्रियकराने ठेवली अट; नवऱ्याला सोडलेल्या महिलेने उचललं धक्कादायक पाऊल हिंदुस्थान टाइम्स च्या रिपोर्टनुसार अहमदाबादमध्ये इलेक्ट्रॉनिक गुड्सचं दुकान चालवणारा अजय पटेल नावाच्या तरुणाच्या गर्लफ्रेंडने त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्याला काही करून आपल्या गर्लफ्रेंडला परत मिळवायचं होतं. त्यासाठी तो अनिल जोशी नावाच्या एका भोंदूबाबाकडे गेला. एका कॉमन फ्रेंडमार्फत तो तिथं गेला होता. आपण आपल्या तंत्रमंत्राने तुझ्या गर्लफ्रेंडला तुझ्या आयुष्यात परत आणू असं आश्वासन या बाबाने त्याला दिलं. त्यासाठी मे 2020 मध्ये 11,400 रुपये घेतले. त्यानंतर तो त्याच्याकडून पैसे उकळतच गेला. असे तब्बल तरुणाने 43 लाख रुपये त्या भोंदूबाबाला दिले. तरी त्याची गर्लफ्रेंड काही परत आली नाही. हे वाचा - VIDEO - ‘मला माझ्या बायकोपासून वाचवा’, नवऱ्याने ढसाढसा रडत मांडली व्यथा अखेर अजयने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला. अजयने सरखेज पोलीस ठाण्यात पुराव्यानिशी तक्रार नोंदवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







